सिनेसृष्टीवर शोककळा; सेलिब्रिटींकडून दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा

सिनेसृष्टीवर शोककळा; सेलिब्रिटींकडून दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा
- Advertisement -


पेशावरमधल्या पठाण फळविक्रेत्याचा मुलगा ते हिंदी चित्रपटांचा पहिला सुपरस्टार, हा प्रवास करणारे दिलीप कुमार यांचं आज निधन झालं. ते ९८ वर्षां होते. दिलीप कुमार यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर सेलिब्रिटी विश्वापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत आणि क्रीडाविश्वापासून उद्योग जगतापर्यंत अनेक मान्यवरांनी भावनिक प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला आहे.

‘भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला. अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली’, अशी भावनीक प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

एका युगाचा अतं…अशा मोजक्या शब्दांत अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेता अक्षय कुमार यानं देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अजय देवगण यानं एक खास फोटो शेअर करत दिलीप कुमार यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळला दिला आहे.

तुमच्या सारखं दुसरं कुणीही नाही! असं अभिनेता मनोज बायपेयी यानं म्हटलं आहे.

अनिल कपूर यांनी शेअर केले खास फोटो

अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंही वाहिली दिलीप कुमार यांना श्रद्धांजली



Source link

- Advertisement -