सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशनने मांडलेल्या मुद्यांबाबत कामगार विभाग सकारात्मक – कामगार मंत्री आकाश फुंडकर – महासंवाद

सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशनने मांडलेल्या मुद्यांबाबत कामगार विभाग सकारात्मक – कामगार मंत्री आकाश फुंडकर – महासंवाद
- Advertisement -




मुंबई दि. 28 :-  सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशन मुंबईच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी कामगार मंत्री श्री. फुंडकर म्हणाले सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशनने मांडलेल्या मुद्यांचा सकारात्मक विचार करून या संदर्भात एक समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये फिल्म सिटी मधील सर्व संबंधितांचा समावेश केला जाईल.

मानधनावर काम करणाऱ्या सिने कलाकारांना वेळेत मानधन मिळावे, कामाचे तास आणि कन्व्हेन्शन अलाउन्स या संदर्भात सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशनने कामगार मंत्री श्री. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुद्दे मांडले.

या बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त श्री. तुम्मोड, उप सचिव श्री. कापडणीस यांच्यासह पूनम ढिल्लो, पद्मिनी कोल्हापुरे, कनवजीत पेंटल, दीपक पराशर, हेतल परमार आदी उपस्थित होते.

००००

एकनाथ पोवार/विसंअ







- Advertisement -