Home शहरे औरंगाबाद सिल्लोड येथील जळीतकांडातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

सिल्लोड येथील जळीतकांडातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

0

औरंगाबाद : अंधारी येथे पेटवण्यात आलेल्या महिलेचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तिच्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. ही महिला आगीमध्ये 95 टक्के भाजली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष सखाराम मोहिते याला अटक केली आहे. त्याला दहा फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

50 वर्षीय महिलेने याविरोधात फिर्याद दिली होती. यानुसार पीडित महिला एकटीच राहते. तिच्या दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे. 2 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री 11 वाजता ही महिला घरात एकटीच होती. याच वेळी गावातील आरोपी संतोष सखाराम मोहिते हा तिथे आला. दार उघडताच समोर आरोपी संतोष दिसला. यानंतर त्या महिलेने त्याला ‘तू रात्री-अपरात्री का येतो, तुझ्यामुळे माझी बदनामी झाली आहे’ असे म्हटले. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. संतप्त आरोपी संतोषने तिला शिवीगाळ व मारहाण करीत घरातील कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले आणि आरोपी पळून गेला.