Home बातम्या आंतरराष्ट्रीय सीरियात पुन्हा इस्लामिक स्टेटचा धोका

सीरियात पुन्हा इस्लामिक स्टेटचा धोका

0

वॉशिंग्टन: अमेरिकेने सीरियातील आपले सैन्य मागे घेऊन ते इराकमधील गनिमांच्या विरोधात तैनात केले आहे. तथापी त्यामुळे सीरियातील इस्लामिक स्टेटच्या जिहादींनी तेथे पुन्हा आपले डोके वर काढले आहे असे अमेरिकेच्या संरक्षण दलाच्या निरीक्षकांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.

इस्लामिक स्टेटच्या गनिमांनी सीरियातील बऱ्याच भूभागावर कब्जा करून तेथे इस्लामिक खिलाफत स्थापन झाल्याची घोषणा केली होती. पण अमेरिकेच्या मदतीने इराक आणि सीरियाच्या फौजांनी या खिलाफतीच्या विरोधात प्रखर लढा देऊन त्यांची ही खिलाफत नाहीशी केली होती. पण त्यांनी आता तेथे पुन्हा डोके वर काढले आहे.

सीरिया आणि इराकमधील जो भाग इस्लामिक स्टेटच्या ताब्यातून सोडवण्यात आला होता. तेथे सरकारी लष्कराचे नियंत्रण आता ढिले पडू लागल्याचे लक्षात येताच जिहादी गट तेथे पुन्हा सक्रिय झाले आहेत. या गनिमांच्या विरोधात लढण्यासाठी तेथील स्थानिक लष्करी जवानांना पुरेसे प्रशिक्षण नाही. त्यामुळे त्यांना या कारवाया आटोक्‍यात ठेवता येत नाहीत. त्यासाठी या सैनिकांना काऊन्टर इन्सर्जन्सी ऑफरेशनचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.