‘सुंदर दिसतेस, चित्रपटात का नाही काम करत?’ युझरच्या प्रश्नावर काय म्हणाली बिग बी यांची नात

‘सुंदर दिसतेस, चित्रपटात का नाही काम करत?’ युझरच्या प्रश्नावर काय म्हणाली बिग बी यांची नात
- Advertisement -


हायलाइट्स:

  • अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर नेहमीच असते चर्चेत
  • नव्याला एका युझरनं दिला बॉलिवूडमध्ये काम करण्याचा सल्ला
  • युझरच्या कमेंटवर नव्यानं दिलेल्या उत्तराचं सोशल मीडियावर होतंय कौतुक

मुंबई: बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियावरील तिचे फोटो अनेकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतात. बॉलिवूडमध्ये सक्रिय नसतानाही नव्याचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहता वर्ग आहे. ज्यांना वाटतं की, नव्यानं बॉलिवूडमध्ये काम करावं. असंच नव्याच्या नुकत्याच शेअर केलेल्या फोटोवर एका चाहतीनं कमेंट करत तिला चित्रपटात काम करण्याविषयी सुचवलं. पण त्यावर नव्यानं दिलेल्या उत्तरानं सर्वांच लक्ष वेधून घेतलं.

नव्यानं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. ज्यात ती पिंक कलरच्या टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये नव्यानं सूर्यफुलाचा इमोजी पोस्ट केला आहे. नव्याच्या या फोटोवर कमेंट करताना एका युझरनं लिहिलं, ‘तू सुंदर आहेस, बॉलिवूडमध्ये काम का नाही करत. तू चित्रपटांसाठी ट्राय करायला हवं.’ या युझरला उत्तर देताना नव्यानं लिहिलं, ‘तुमच्या प्रेमळ शब्दांसाठी धन्यवाद. पण एक सुंदर मुलगी बिझनेसही चालवू शकतात.’ नव्याच्या या कमेंटवर अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. बॉलिवूडच्या नावाजलेल्या घराण्यातील मुलगी असताना तिथे न वळता व्यवसाय क्षेत्रात काम करण्याच्या नव्या इच्छेचं सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.


नव्याच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनीच नाही तर अनेक सेलिब्रेटींनीही कमेंट केल्या आहेत. प्रसिद्ध फोटोग्राफर रोहन श्रेष्ठानं कमेंट करताना लिहिलं, ‘कॅप्शन प्रेरणादायी आहे’ यावर नव्यानं, ‘अगदी माझ्यासारखं’ असं मजेदार उत्तर दिलं आहे. याशिवाय नव्याच्या या फोटोवर महिप कपूर, खुशी कपूर यांनीदेखील हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.

श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांची मुलगी नव्या नवेली नंदा हिला अभिनय क्षेत्रात नाही तर फॅमिली बिझनेस करण्याची इच्छा आहे. नव्यानं फोर्डहॅम यूनिवर्सिटीमधून मागच्याच वर्षी डिजिटल टेक्नोलॉजी आणि यूएक्स डिजाइनमध्ये आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. त्यानंतर तिनं एक एनजीओ सुरू केला आहे. या व्यतिरिक्त नव्या अनेकदा तिच्या लव्ह लाइफमुळे तसेच सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.





Source link

- Advertisement -