हायलाइट्स:
- सुकन्या मोने यांच्या घरी नवीन सदस्याचे आगमन
- इन्स्टाग्रामवर फोटो आणि पोस्ट करून सुकन्या यांनी दिली माहिती
- शुभमंगल ऑनलाईन मालिकेत काम करत आहेत सुकन्या मोने
अलिकडेच सुकन्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमधून त्यांनी मोने कुटुंबामध्ये नव्याने आलेल्या सदस्याची माहिती देत, त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. इतकेच नाही तर एक छानशी पोस्टही शेअर केली आहे.
काय लिहिले आहे सुकन्या मोने यांनी
सुकन्या मोने यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, ‘ कितीतरी महिने नवीन गाडी घ्यायची मनात चालू होतं कारण आधीची SX4 10 वर्षे यथेच्छ वापरली, खूप साथ दिली होती तिने पण दुसरी कुठली आम्हाला पसंतच पडत नव्हती मग संजय म्हणाला इलेक्ट्रिक गाडी बघू,माझ्या मनाला काही पटत नव्हतं कारण अनेक प्रश्न भेडसावत होते… चार्ज कशी आणि कुठे करायची? किती वेळ बॅटरी पुरेल वगैरे वगैरे. मनाची तयारी करून मी आणि माझा सारथी चंदन प्रभादेवीच्या टाटा मोटर्स ला गेलो आणि TATA nexon ev बघताक्षणी आवडली आणि ठरवलं हीच घ्यायची. त्याचे फायदे पुनीत मोटर्स च्या सिद्धेश ने आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितले,त्याची कार्यप्रणाली सुमेध नामजोशी ने सविस्तर सांगितले आणि आम्ही लगेच बुक केली. लॉकडाऊन… आम्हाला झालेला कोविड यामुळे गाडी यायला उशीर झाला पण अखेर २५ जून २०२१ ला आमची गाडी आली.’सुकन्या यांनी पुढे लिहिले आहे की, ‘ यात काय एवढं कौतुक असं वाटेल तुम्हाला पण पेट्रोल आणि डिझेल च्या किमती इतक्या गगनाला पोचल्या आहेत की अश्यावेळी भविष्याचा विचार करणारी, पर्यावरणाचा समतोल राखणारी( non pollution), eco friendly गाडी घेतल्याचा आनंद तुमच्याबरोबर शेअर करावासा वाटला…’ असे म्हणत सुकन्या यांनी टाटा मोटर्स, रतन टाटा यांना टॅग करत त्यांचे आभार मानले आहे. त्याचप्रमाणे संजय मोने यांचे देखील मनापासून आभार मानत गाडीसोबतचा त्यांचा फोटोही शेअर केला आहे.