Home मनोरंजन सुखी संसाराची २० वर्षे! सुबोध-मंजिरी भावे यांच्या लग्नाचे फोटो एकदा पाहाच!

सुखी संसाराची २० वर्षे! सुबोध-मंजिरी भावे यांच्या लग्नाचे फोटो एकदा पाहाच!

0
सुखी संसाराची २० वर्षे! सुबोध-मंजिरी भावे यांच्या लग्नाचे फोटो  एकदा पाहाच!

[ad_1]

मुंबई: प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं. सिनेसृष्टीतलही ही गोष्ट अगदी तंतोतंत लागू होताना सध्या दिसतेय. अनेक बड्या अभिनेत्यांच्या पाठीशी त्यांच्या पत्नी ठामपणे उभ्या राहिल्या आहेत. अशीच एक जोडी आहे अभिनेता सुबोध भावे आणि त्याची पत्नी मंजिरी यांची. दोघांच्या लग्नाचा आज २० वाढदिवस. या खास दिवशी सुबोधनं एक खास पोस्ट शेअर करत मंजिरीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘लग्नाच्या २० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप काही न लिहिता ‘तू तिथे मी’ इतकंच’, असं म्हणत सुबोधनं काही मोजक्या शब्दांत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लव्हस्टोरी आहे फिल्मी
सुबोध आणि मंजिरीची प्रेमकथा एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. सुबोधने मंजिरीला आठवीला असताना प्रपोज केलं होतं. या प्रपोजचं उत्तर द्यायला मंजिरीने चार दिवस घेतले होते. अखेर पाचव्या दिवशी तिने सुबोधला होकार दिला. लग्नबंधनात अडकण्यापूर्वी मंजिरी आणि सुबोध जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट करत होते. आज त्यांच्या नात्याला काही दिवसांपूर्वी ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. आयुष्याच्या प्रत्येक अडचणीचा त्यांनी मिळून सामना केला. एकमेकांना धीर देत आणि एकमेकांचा आधार बनत त्यांनी आयुष्याची ३० वर्ष सोबत घालवली.



[ad_2]

Source link