‘अग्गबाई सुनबाई’ मालिका नव्या वळणावर; शुभ्राच्या आयुष्यात येणार खास व्यक्ती
जवळपास ३ मिनिटांच्या या मेकिंग व्हिडिओत सलमान जॅकलिनचं खूप कौतुक करताना दिसतोय. त्याच्या म्हणण्यानुसार, ज्या ताकदीने आणि इच्छाशक्तीने जॅकलिनने या गाण्यावर नृत्य केलं तसं दुसरी कोणतीही अभिनेत्री करू शकली नसती. गाण्यात खूप कठीण स्टेप्स होत्या ज्या करताना जॅकलिनला खूप मेहनत घ्यावी लागली. तिला अनेक ठिकाणी दुखापत झाली तरीही तिने जिद्दीने गाण्याचं चित्रीकरण पूर्ण केलं. गाण्याचं नृत्य दिग्दर्शन शबीना खान यांनी केलं असून त्यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभू देवा यांनी शबीनाला फक्त एकच गोष्ट सांगितली होती ती म्हणजे मजा आली पाहिजे.
व्हिडिओत जॅकलिनदेखील तिच्या गाण्याच्या प्रवासाबद्दल बोलताना दिसतेय. व्हिडिओत जॅकलिन म्हणते, ‘हे गाणं करणं खूप जास्त अवघड होतं. स्टेप्स इतक्या कठीण होत्या की त्या करता करता माझे गुडघे पाच पट सुजले होते. ते खूप मोठे दिसत होते. अनेकदा हात, पाय, मान लचकली, गुडघ्यांना मार लागला, पाठ तर भयंकर दुखत होती. अशा अनेक गोष्टी झाल्या पण आम्ही थांबलो नाही. आम्ही गाण्याचं चित्रीकरण पूर्ण केलं. न हरता आणि आता आमच्या मेहनतीचं फळ सगळ्यांसमोर आहे.’ जॅकलिनने खरंच गाण्यात धुमाकूळ घातला आहे. प्रचंड ताकदीने आणि उत्तम हावभावाने तिने हे गाणं एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं आहे.
तो छोटा राजन नव्हता ना…नातेवाईकाला मिळाला नाही ICUबेड;सुतापा यांचा संताप