‘सुनलो हमारी बात’… आमदार बच्चू कडूंच भर पावसात अन्नत्याग आंदोलन

- Advertisement -

मुंबई : प्रहार क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारविरुद्ध एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. विधिमंडळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच चक्क पडत्या पावसात कडूंनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे. मतदारसंघातील समस्यांकडे सरकार जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे. तसेच, मतदारसंघातील कामांना केवळ मंजुरी देण्यात आली असून सरकार निधी देत नसल्याचा आरोप करत कडू यांनी हे एकदिवसीय आंदोलन पुकारले आहे.   

विधानसभेच्या विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा आहे. त्यानंतर, विधानसभा निवडणुकीनंतरच नव्या सरकारसह पहिले अधिवेशन होणार आहे. त्यामुळे, सरकारकडून आपल्या मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन सरू केले आहे. विशेष म्हणजे विधिमंडळात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पडत्या पावसात आमदार कडू उपोषण करत आहे. आपल्या मतदारसंघात 200 खाटांचे रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे, पण अद्याप त्यासाठी निधी नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राचेही भूमिपूजन झाले, पण त्यालाही निधी दिला नाही. अचलपूर जिल्हानिर्मित्तीचाही प्रश्न महत्त्वाचं आहे. वासनी प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाची अधिसूचना सरकारने काढावी. राजुरा येथील घरांना 15 लाखांचा निधी द्यावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. 

- Advertisement -