हायलाइट्स:
- मानधनाच्या बाबतीत विजयने बॉलिवूड अभिनेत्यांनाही सोडलं मागे
- आगामी चित्रपटासाठी विजयने घेतलं आहे रजनीकांत यांच्यापेक्षाही जास्त मानधन
- विजयच्या ‘मास्टर’ चित्रपटाने जिंकली होती प्रेक्षकांची मनं
‘मर्द बनो’ संजय दत्तचा जुना व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल
विजयने मानधनाच्या बाबतीत दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे देवता मानले जाणारे रजनीकांत यांनाही मागे टाकलं आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, विजय ‘महर्षी’ चित्रपटाचे दिग्दर्शक वामसी पैदिपल्ली यांच्या आगामी चित्रपटात काम करणार आहे. विजयने ‘थालापती ६५’ साठी कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतलं आहे. या चित्रपटाबद्दल अजून कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, वामसी यांनी विजयसोबत आगामी चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती. या चित्रपटासाठी विजयने घेतलेली रक्कम ऐकून चाहत्यांनीही तोंडात बोटं घातली आहेत.
रजनीकांत यांनी त्यांच्या ‘दरबार’ चित्रपटासाठी जवळपास ९० कोटी रुपयांचं मानधन घेतलं होतं. विजयने तर त्यांनाही मागे टाकत आगामी चित्रपटासाठी १०० कोटींचं मानधन घेतलं आहे. ठरलेल्या मानधनाच्या ५० टक्के म्हणजे ५० कोटी विजयला यापूर्वीच देण्यात आले आहेत. वृत्तवाहिनीने दिलेली ही माहिती खरी ठरल्यास विजय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता होईल. विजयच्या ‘मास्टर‘ चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. ‘मास्टर’ २०२१ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. विजयच्या लोकप्रियतेला पाहून त्याचे आगामी चित्रपटही बॉक्स ऑफिसवर हिट ठरतील यात शंका नाही.
अक्षय कुमार पोहोचला काश्मीरमधील बीएसएफ कॅम्पवर; सैनिकांसोबत साधला संवाद