Home गुन्हा सुप्रीम कंपनीच्या २७ जणांविरुध्द गुन्हा

सुप्रीम कंपनीच्या २७ जणांविरुध्द गुन्हा

0

जळगाव : शासनाने ठरवून कंपनी कायद्याचे उल्लंघन करुन खोटे व बनावट दस्ताऐवज तयार करुन गुणवत्ता अधिकाऱ्याचीच फसवणूक केल्याप्रकरणी सुप्रीम कंपनीचे चेअरमन, संचालक, कार्यकारी संचालक, सी.ए. व अधिकारी अशा एकूण २७ जणांविरुध्द सोमवारी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. प्रमोद बालकिसन मंत्री (४९, रा.शिवराणा नगर, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
किमान वेतन, शासनाकडे जमा करावयाची प्रॉव्हीडंट फंडाची रक्कम, ग्रॅज्युटी, बोनस व निवृत्ती वेतन यात खोटे व बनावट कागदपत्रे बनवून ते खरे असल्याचे भासविल्याचा आरोप आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सुप्रीम इंडस्ट्रीजचे चेअरमन बी.एल.तापडिया, का. संचालक एम.पी.तापडिया, वरिष्ठ उपाध्यक्ष जे.एम.तोतला, संचालक एस.जे.तापडिया, व्हि.के.तापडिया, बी.व्ही.भार्गव, ई.बी.देसाई, एच.एस.पारेख, एन.एस.खंडेलवाल, एस.आर.तापडिया, वाय.पी.त्रिवेदी यांच्यासह महाव्यवस्थापक जी.के. सक्सेना, संजय यशवंत प्रभुदेसाई, व. महाव्यवस्थापक शकील अहमद शेख, व्यवस्थापक ए.एस.मुळे, सतीश भगीरथ सोमानी, सुरेश मंत्री, अनिल काशिनाथ काबरा, राजू कोठारी, अतुल लठ्ठा, मनिष पाठक, महेश एम.पाटील, अशोक मोगरे, जितेंद्र बडगुजर, जे.एच.चौधरी व एच.एन.जैन आदी.