हायलाइट्स:
- सुयशने आयुषी भावेसोबत उरकला साखरपुडा
- सुयशची भावी जोडीदार कोण असा चाहत्यांना प्रश्न
- आभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगना आहे आयुषी भावे
दिलीप कुमार यांच्या सावली होऊन राहिल्या सायरा बानो
आयुषी ही एक अभिनेत्री असून ती एक उत्कृष्ट नृत्यांगनादेखील आहे. आयुषीने ‘महाराष्ट्राची श्रावणक्वीन’ हा किताब स्वतःच्या नावे केला आहे.
याशिवाय झी युवा वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ कार्यक्रमात देखील आयुषी झळकली आहे. आयुषी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
आयुषीचे अनेक डान्स व्हिडीओ तिच्या अकाउंटवर पाहायला मिळतात. यासोबतच आयुषी लवकरच एका चित्रपटातदेखील झळकणार आहे. आयुषीचा एक लावणी व्हिडीओदेखील युट्युबवर प्रसिद्ध आहे. त्यात आयुषी ‘या गावाचं की त्या गावाचं’ गाण्यावर लावणी करताना दिसत आहे.
आज आयुषीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुयश आणि आयुषीने त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टीची घोषणा केली आहे. सुयश आणि आयुषीने जून महिन्याच्या सुरुवातीलाच साखरपुडा उरकला होता. परंतु, चाहत्यांसोबत ही बातमी शेअर करण्यासाठी त्यांनी आजचा दिवस निवडला. साखरपुड्यासाठी सुयश आणि आयुषीने केलेल्या पेहरावाचं देखील सोशल मीडियावर कौतुक होत आहे. सुयश सध्या ‘शुभमंगल ऑनलाइन’ मालिकेत शंतनूची भूमिका साकारत आहे.
अभिनेता सुयश टिळकचा पार पडला साखरपुडा; चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

























WhatsApp