Home ताज्या बातम्या सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबियांना पी-४ संस्थेकडून अन्नधान्य कीट वाटप

सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबियांना पी-४ संस्थेकडून अन्नधान्य कीट वाटप

0

पुणे : प्रतिनिधी

देशात सर्वत्र कोरोनाविषयीचा संसर्ग पसरत आहे. सर्वत्र संचारबंदी लागू गेल्या १ महिन्यापासून लागू आहे. यामुळे गरीब व असंघटीत कामगारावर उपासमारीची पाळी आली आहे. यावर पी-४ ने आपत्ती व्यवस्थापण समितीच्या काही मालकांनी पुढाकार घेतला आहे. उपाययोजना म्हणून या कामगारांच्या कुटुंबियांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात येत आहे. १२५ कुटुंबाना अन्नधान्य व जीवनउपयोगी वस्तूच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. पी ४ मधील अशा लोकांची माहिती घेतली जात असून त्यांनाही या किटचे वाटप करण्यात येणार आहे. त्यांना पुढील दोन महिन्याचे अन्नधान्य सहज उपलब्ध दिले आहे. अशा अत्यंत गरजू सुरक्षा रक्षकांनी आपली माहिती देण्याचे आवाहनही पी-४च्या मुख्य समन्वयक सचिन मोरे यांनी केले आहे.जेणेकरून अंत्यंत गरजू कर्मचार्यांना अन्नधान्याच्या पुरवठा करता येईल. अन्नधान्याच्या किट वाटप पी-४ आपत्ती व्यवस्थापणचे समन्वयक तथा कोर कमिटी संभाजी उकिरडे, प्रमोद होले, संभाजी बुचडे, दिनेश रायकवार, विष्णू जाधव, मनेश घुले, सोमनाथ गायकवाड, बालाजी माने, ब्रिजेश तिवारी, ज्ञानेश्वर चोरघे, प्रकाश जाधव, सुवर्णा चाकोरकर..इ यांच्या नियोजनात वाटप करण्यात येत आहे.

या उपक्रमात किंमतीलाल शर्मा, राज राठोड, तानाजी भोसले,वैभव पाटील, अंकुश ढमढेरे, प्रवीण भोसले, प्रवीण ढोकले, प्रवीण वाळके, संदीप शिवले, प्रकाश लोले, शरद काळे, शरद शिंदे, शिवशरण सर, ज्ञानेश्वर गायकवाड, किशोर जाधव, किशोर सरोदे , अनिल बेंद्रे, मनोज चौगुले, दिलीप क्षेत्रे, कुशल लोणकर, अविनाश जगताप, प्रमोद देशमुख, दिलीप सोनवणे, राजेश मुर्गीरकर, प्रमोद घाडगे, सागर नाझीरकर, सुभाष पगारे, सुनील खुड्वे,नयन घुले,नितीन वायदंडे,चंद्रसेन साळुंके,सिंग सर, विशाल कटके,स्नेहल कोल्हापूरकर,आनंद सावळे, शुक्ला बंधू…इ मालकांनी सहभाग नोंदवला आहे.