अंकिता स्वत:ला सावरूच शकत नाही आहे.
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या म्हणजे सर्वांसाठी धक्का आहे. मात्र त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला मोठा धक्का बसला आहे, त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून तू स्वत:ला सावरूच शकत नाही आहे. आजच ती सुशांतच्या मुंबईतील घरी गेली, तिथला व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये अंकिताची अवस्था कशी झाली आहे ते आपण पाहू शकतो.सुशांतच्या मृत्यूची बातमी कळताच ती सु्न्न झाली होती. त्यानंतर ती खूप रडल्याचंही समजतं आहे. आज आपल्या परिवारासोबत सुशांतच्या वांद्रे येथील घरी पोहचली.अंकिता आणि सुशांत हे टेलिव्हिजन जगतातील सर्वांचे आवडते कपल होते. दोघांच्या ब्रेकअपनंतर अनेकांना त्याबाबत वाईट वाटले होते. पवित्र रिश्ता या मालिकेतील मानव-अर्चना या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण त्यासोबत नंतर अंकिता आणि सुशांत हे दोघेही एकत्र आले होते.