Home मनोरंजन सुशांतसिंह राजपूतचं मुंबईतलं घर मिळतंय भाड्याने, फक्त मोजावी लागेल एवढी रक्कम

सुशांतसिंह राजपूतचं मुंबईतलं घर मिळतंय भाड्याने, फक्त मोजावी लागेल एवढी रक्कम

0
सुशांतसिंह राजपूतचं मुंबईतलं घर मिळतंय भाड्याने, फक्त मोजावी लागेल एवढी रक्कम

[ad_1]

हायलाइट्स:

  • समुद्रकिनारी आहे सुशांतचं सी व्यू अपार्टमेन्ट
  • एका महिन्याचं भाडं आहे चार लाख रुपये
  • याच घरात झाला होता सुशांतच्या मृत्यू

मुंबई– बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या जाण्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर तो राहत असलेला वांद्रे येथील फ्लॅट पोलीस तपासाचा एक महत्वाचा भाग झाला होता. अनेकदा पोलीस अधिकारी तपासासाठी या घरात ये- जा करत. सुशांतच्या मृत्यूनंतर हा फ्लॅट रिकामा असल्याने आता घरमालकाने हा फ्लॅट भाड्याने देण्याचा विचार सुरू केला आहे. हे घर सी व्यू अपार्टमेन्टच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. सुशांतने या घरात बरेच सकारात्मक बदल केले होते. समुद्रकिनारी असलेल्या या घरासाठी आता मालक भाडेकरुच्या शोधात आहे.

मैत्री करावी तर या राजा माणसाशी… राज ठाकरेंसाठी केदार शिंदेंची खास पोस्ट


घर दाखवणाऱ्या ब्रोकरने म्हटलं, ‘हे घर भाड्याने देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आता फक्त भाडेकरू ठरायचा आहे. करोनामुळे अनेक लोक घर पाहण्यासाठी येत नाहीत आणि जे येतात ते सुशांतबद्दल विचारणा करतात.’ टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ‘हे घर बरंच मोठं असल्याने आणि मुख्यतः समुद्रकिनारी असल्याने या घराच्या एका महिन्याच्या भाड्याची किंमत चार लाख रुपये आहे. हे घर त्या व्यक्तींसाठी अतिशय योग्य आहे जे कामानिमित्त मुंबईत आले आहेत. घरमालकाने देखील घराला भाड्याने देण्यासाठी संमती दर्शवली आहे. त्यांच्यामते घर प्राइम लोकेशनवर असल्याने लवकरात लवकर भाडेकरू मिळतील.


सुशांतदेखील या घरात भाड्याने राहत होता. तो रिया चक्रवर्ती आणि सिद्धार्थ पिठानीसोबत या घरात राहत होता. यासोबत त्यांच्या घरात काम करणारे केशव आणि नीरजदेखील याच घरात राहत. सुशांतने हे घर २०१९ ला भाड्याने घेतलं होतं. सुशांत २०२२ पर्यंत या घरात राहणार होता. सुशांत या घरासाठी भाडं म्हणून ४ लाख ५१ हजार रुपये देत असे. याच घरात सुशांतने आत्महत्या केली होती.

सुशांत नक्की कोण होता? कसा होता? अंकितानं शेअर केलेल्या व्हिडिओत मिळाली सर्व प्रश्नांची उत्तरं



[ad_2]

Source link