Home ताज्या बातम्या सूरत : रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग, आगीचे कारण अस्पष्ट

सूरत : रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग, आगीचे कारण अस्पष्ट

0

सूरत : गुजरात येथील सूरतमधील रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली. आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाच्या तब्बल 40 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही भीषण आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मंगळवारी (21 जानेवारी) सूरतमधील रघुवीर सेलियम मार्केटमध्ये पहाटे ही भीषण आग लागली. ही इमारत दहा मजली आहे. सातव्या मजल्यावर ही आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.