Home शहरे अकोला सैनिकांच्या शासन दरबारी प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी ’अमृत जवान’ अभियान – माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे

सैनिकांच्या शासन दरबारी प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी ’अमृत जवान’ अभियान – माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे

0
सैनिकांच्या शासन दरबारी प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी ’अमृत जवान’ अभियान – माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे

मुंबई दि 13:- राज्यातील विविध शासकीय कार्यालयात शहीद जवानमाजी सैनिकशहीदांच्या विधवाकर्तव्यावर कार्यरत असणारे सैनिक यांचे कुटुंबिय यांची अनेक शासकीय कामे असतात. शासन दरबारी अशा प्रलंबित असणा-या कामांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी देशाच्या 75 व्या स्वातंत्रदिनाच्या महोत्सवानिमित्त अमृत जवान अभियान 2022 दि. 1 मे 2022 ते 15 जून 2022 या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

यासंदर्भातील शासन निर्णय 13 एप्रिल रोजी निर्गमित करण्यात आला आहे. महसूलभूसंपादनपुनर्वसनविविध प्रकारचे दाखलेपोलीस विभागाकडील तक्रारीग्रामविकास विभागाच्या विविध योजनाकृषि विभागाकडील विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठीचे प्रस्तावसहकार विभागाकडील कर्ज प्रकरणे इ.परिवहन विभागाचे परवाने अशा कामांसाठी विशेष मेळावे घेवून शहीद जवान,माजी सैनिक व सेवेत कार्यरत सैनिकांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी अभियान राबविण्यात यावे, असे निर्देश श्री.भुसे यांनी दिले होते. त्यानुसार हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी तालुका व जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतीलमुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषदपोलीस अधीक्षकमहानगरपालिका आयुक्तजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारीजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाउपवनसंरक्षकउपप्रादेशिक परिवहन अधिकारीअधिक्षक अभियंता सा.बां.वि.अधिक्षक अभियंता जलसंपदाअधिक्षक अभियंता महावितरणजिल्हा शल्य चिकित्सकजिल्हा अधिक्षक भूमीअभिलेखजिल्हा सैनिक कल्याण अधिकारीमाजी सैनिक जिल्हा संघटनेचा एक प्रतिनिधीसंरक्षण विभागातील एक प्रतिनिधी अशा सदस्यांची समिती असेल. तर निवासी उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव असतील.

त्याचप्रमाणे तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखालीउपविभागीय पोलीस अधिकारीगटविकास अधिकारी पं.स.सहा. निबंधक सहकारी संस्थातालुका कृषि अधिकारीमुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायतउपअधिक्षक भूमी अभिलेखतालुक्यातील माजी सैनिक संघटनेचा एक प्रतिनिधीविशेष निमंत्रित हे या समितीचे सदस्य असतील. तहसिलदार समितीचे सदस्य सचिव असतील.

दर महिन्याच्या तिस-या सोमवारी लोकशाही दिनाच्या धर्तीवर अमृत जवान सन्मान दिन आयोजित करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत. 

 हे अभियान राबविण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक तहसिल कार्यालयात एक खिडकी कक्ष या तत्वाप्रमाणे सहायता कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षासाठी स्वतंत्र कर्मचा-याची नेमणूक होणार असून दुपारी 12 ते 3 या कालावधीत विभागांकडील विविध तक्रार अर्ज स्विकारण्यात येतील व संबंधितांना प्राप्त झालेल्या अर्जाची पोहोच तात्काळ देवून अर्ज संबंधित विभागाकडे वर्ग होणार आहे. प्रलंबित तक्रारी निवारण्यासाठी प्रत्येक विभागाला ठराविक कालमर्यादा असेल व त्याचे सनियंत्रण जिल्हाधिकारी करतील. हा शासन निर्णयमहाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०२२०४१३१५२८००५२०७ असा आहे.