मुंबई: ‘आर्ची’ आणि ‘परश्या’ या जोडीनं केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाला स्वतःची दखल घ्यायला लावली. ‘सैराट’ या मराठी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. या चित्रपटाचं देशभरात कौतुक झालं आणि यातली पात्रं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या चित्रपटावरून प्रेरीत होत ‘धडक’ हा हिंदी चित्रपटही आला.
आता काही वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘आर्ची-परश्या’ एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले तर? अशी चर्चा सध्या मनोरंजनविश्वात सुरू आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार असं बोललं जात आहे; पण तो चित्रपट ‘सैराट २’ नसून ‘झुंड’ हा आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. नुकताच रिंकू आणि आकाशचा सोशल मीडियावर एकत्र फोटो व्हायरल झालाय. या फोटोमुळे या सिनेमाच्या चर्चेनं अधिकच जोर धरला आहे. पण, आता याबाबत अधिकृत घोषणा कधी होतेय; याची चाहते वाट बघत आहेत.
- Advertisement -