Home बातम्या व्यवसाय सोनं झालं स्वस्त ; देशव्यापी लॉकडाउनच्या भीतीने सोन्याचे भाव गडगडले

सोनं झालं स्वस्त ; देशव्यापी लॉकडाउनच्या भीतीने सोन्याचे भाव गडगडले

0
सोनं झालं स्वस्त ; देशव्यापी लॉकडाउनच्या भीतीने सोन्याचे भाव गडगडले

[ad_1]

हायलाइट्स:

  • दुसऱ्या देशव्यापी लॉकडाउनच्या भीतीने आज कमॉडिटी बाजारात गुंतवणूककारांनी जोरदार विक्री केली.
  • यामुळे मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजमध्ये आज सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण झाली.
  • अनेक राज्यांनी स्थानिक पातळीवर लॉकडाऊन घोषित केला आहे.

मुंबई : करोनाचा कहर सुरुच असून दुसऱ्या देशव्यापी लॉकडाउनच्या भीतीने आज कमॉडिटी बाजारात गुंतवणूककारांनी जोरदार विक्री केली. यामुळे आज सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण झाली. सोन्याचा भाव तब्बल ३२९ रुपयांनी घसरला होता. तर चांदीमध्ये ५५० रुपयांची घसरण झाली होती.

करोनाबाबत गाफीलपणा नडला; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची केंद्रावर कठोर टीका म्हणाले…
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सध्या सोन्याचा भाव ४७३०५ रुपये असून त्यात १४ रुपयांची घसरण झाली आहे. तत्पूर्वी सोने ४७०११ रुपयांपर्यंत खाली आले होते. गेल्या सोने आठवडाभरात १५०० रुपयांनी स्वस्त झाले होते.आज चांदीच्या किमतीत देखील घसरण दिसून आली आहे. सध्या चांदीचा भाव ७०८२५ रुपये असून त्यात ७५ रुपयांची घट झाली आहे. तत्पूर्वी चांदी ७०३८० रुपयांपर्यंत खाली घसरली होती.

देशव्यापी लॉकडाउन? शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स-निफ्टीत पडझड
Goodreturns या वेबसाईटनुसार आज मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४५७० रुपये आहे तर २४ कॅरेटचा भाव ४५५७० रुपये आहे. त्यात २१० रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५७८० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४९९८० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४५२० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८५७० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६५२० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९३१० रुपये आहे.

करोना संकटात दिलासा; ‘रिलायन्स’ देणार दोन लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना बोनस
जागतिक बाजारात सोन्याचा भाव १७६७. १२ डॉलर प्रती औस इतका आहे. चांदीमध्ये देखील ०.६ टक्के घसरण झाली असून चांदीचा भाव २५.९४ डॉलर प्रती औंस आहे. देशातील दैनंदिन करोना रुग्णसंख्या चार लाखांवर गेली आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी स्थानिक पातळीवर लॉकडाऊन घोषित केला आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या कोव्हीड टास्क फोर्सने सरकारला देशव्यापी लॉकडाउनचा पर्याय सुचवला आहे.

[ad_2]

Source link