सोशल मीडियावर सोनाक्षीचा व्हिडिओ व्हायरल
मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा एका वादात अडकली आहे. रस्त्यावर चालू गाडीत व्हिडिओ शूट करणं सोनाक्षीला महागात पडलं आहे. सोशल मीडियावर सोनाक्षीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती अतिशय बेजबाबदारपणे गाडी चालवत असल्याचं दिसतंय.
सोनाक्षीसोबत या कारमध्ये अक्षय कुमार, तापसी पन्नूही दिसत आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते जात असल्याचं दिसतंय.
एका पंजाबी गाण्यावर सर्वजण थिरकताना दिसतात. या व्हिडिओमध्ये सोनाक्षी ड्रायव्हिंग सीटवर बसली आहे. ड्रायव्हिंग सीटवर बसून ती एका हाताने डान्स करतेय. तर दुसऱ्या हाताने व्हिडिओ शूट करताना दिसतेय. व्हिडिओमध्ये सोनाक्षी स्टेअरिंग न पकडताही गाडी चालवताना दिसतेय. अतिशय धोकादायकरित्या हा व्हिडिओ बनवण्यात आलाय.
बेजबाबदारपणे गाडी चालवताना अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा व्हिडिओ व्हायरल… मुंबई पोलिसांत तक्रार दाखल – https://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/J73svMSFgZ
हा व्हिडिओ बनवताना स्वत:ची तर नाहीच, शिवाय रस्त्यावर चालणाऱ्या इतरांचीही चिंता केली जात नाही. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावर मुंबई पोलिसांकडे सोनाक्षी सिन्हाविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.