सोन्याचा व्यापाराला धाक दाखवून लुटणारा जेरबंद

- Advertisement -

पुणे : परवेज शेख

सोन्याच्या व्यापाऱ्यास धाक दाखवून पैसे लुटले
मुंबईच्या सोन्याच्या व्यापाऱ्याला पुण्यामध्ये लुटण्यात आले दिनांक २०/०३/२००० रोजी सायंकाळी 07:45 वाजता इंदर मल जैन वय 42 राहणार परळ मुंबई हे सोन्याचे व्यापारी मुंबईवरून सोने विकण्यासाठी पुण्यातील ज्वेलर कडे आले होते सोने विकून मिळालेले रोख रक्कम घेऊन मुंबईला जाण्यासाठी रिक्षाने पुणे स्टेशन कडे जात असताना रास्ता पेठेतील ताराचंद हॉस्पिटल समोर अनोळखी इसमांनी त्यांचे रिक्षा अडवून त्यांच्यावर मिरची पूड टाकून चॉपर व कोयत्याने वार करून पैशाची बॅग हिसकावून नेले याबाबत त्यांचे पाटनर अशोक कुमार जैन राहणार काळाचौकी मुंबई यांनी फिर्याद दिल्याने समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 48 2000 भादवि कलम 395 397 प्रमाणे शस्त्र दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी काही आरोपी दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आले होते सदर गुन्ह्यात राजू गायकवाड राहणार मुक्काम पोस्ट दिवे तालुका पुरंदर जिल्हा पुणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे 19 वर्षांपासून फरार होता दिनांक 13/ 01/ 2019 रोजी युनिटेक गुन्हे शाखा पुणे शहर यांच्याकडील अधिकारी व कर्मचारी समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस कर्मचारी अमोल पवार यांना बातमीदार मार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यात 19 वर्षापासून फरारी असलेला आरोपी नाव राजू गायकवाड हा कंनक हॉटेल समोर शंकरशेट रोडवर उभा आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन परवानगीने युनिट 1 गुन्हे शाखा पुणे शहर पथकाकडे स्टाफ सह बातमीप्रमाणे जाऊन नमूद आरोपीस ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव राजू जगन्नाथ गायकवाड वय 45 वर्ष राहणार मुक्काम पोस्ट दिवे तालुका पुरंदर जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे समर्थ पोलीस स्टेशन वरील दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने त्याच विश्वासात घेऊन तपास करता त्याने सांगितले की मी व इतर साथीदार असे आम्ही ताराचंद हॉस्पिटल समोर रिक्षा अडवून मिरची पोर टाकून चॉपर व कोयत्याने वार करून मुंबईच्या सोन्याचे व्यापाऱ्याची पैशाची बॅग हिसकावून घेऊन गेलो होतो त्यावेळी मी सुद्धा त्यांच्याबरोबर होतो व सदर गुन्हा दाखल झाल्या पासून सुमारे 19 वर्षांपासून मी फरारी आहे असे कबूल केल्याने आरोपीस पुढील कारवाईसाठी समोर पोलीस स्टेशन पुणे यांनी ताब्यात घेतले आहे सदरची कामगिरी माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे माननीय पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली युनिटेक गुन्हे शाखा पुणे शहर चे पोलीस निरीक्षक श्री अरुण वायकर पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे पोलीस कर्मचारी योगेश जगताप अमोल पवार वैभव स्वामी अजय थोरात अनिल घाडगे यांनी याबद्दल कामगिरी केली.

- Advertisement -