Home ताज्या बातम्या ‘सोनिया गांधींचा राग नको म्हणून तिसऱ्या आघाडीच्या बैठकीकडे शिवसेनेची पाठ’

‘सोनिया गांधींचा राग नको म्हणून तिसऱ्या आघाडीच्या बैठकीकडे शिवसेनेची पाठ’

0
‘सोनिया गांधींचा राग नको म्हणून तिसऱ्या आघाडीच्या बैठकीकडे शिवसेनेची पाठ’

हायलाइट्स:

  • दिल्लीत पुन्हा पवार-प्रशांत किशोर भेट
  • तिसऱ्या आघाडीसाठी शरद पवारांच्या घरी बैठक
  • भाजपनं साधला निशाणा

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी आज राष्ट्र मंचाची बैठक होत आहे. या बैठकीला देशातील काही प्रमुख नेते व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भाजपविरोधी तिसऱ्या आघाडीची ही तयारी असल्याचं बोललं जात आहे. यावर भाजपनं सडकून टीका केली आहे. तसंच, ही तिसरी आघाडी म्हणजे त्याच तिकीटावर पुन्हा तोच खेळ, असल्याची टीका महाराष्ट्र भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केली आहे.

‘एक नवीन आघाडी करण्याचा प्रयत्न म्हणून ज्या हालचाली गेले दोन दिवस सुरु आहेत तो म्हणजे ‘त्याच तिकीटावर पुन्हा एकदा तोच खेळ’, या प्रकरच्या आहेत. अशाप्रकाराच्या आघाड्या उभ्या करण्याचा प्रयत्न भारताच्या राजकारणात गेल्या १०-१२ वर्षात अनेकदा झाला. आता त्या आघाडीला कितवी आघाडी बोलायची हा सुद्धा आकडा शरद पवारांच्या लक्षात राहिला नसेल. दर पाच वर्षांनी बिगर भाजपा, बिगर काँग्रेस आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला जातो हा त्यातलाच प्रकार आहे, असं भंडारी यांनी म्हटलं आहे.

वाचाः पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; ‘हे’ मुद्दे गाजणार

‘या आघाडीच्या चर्चेसाठी जे नेते जमले होते त्यां सगळ्या नेत्यांचं त्यांच्या राज्यातील अस्तित्व संपलं आहे. ज्या नेत्याचं त्यांच्या राज्यात स्थान, दबदबा आहे, असे कोणीही नेते या आघाडीच्या बैठकीकडे फिरकले सुद्धा नाही. ज्यांना घेऊन आघाडीचा प्रयत्न केला जातो त्यांना काही या आघाडीत रस नाही असंच दिसून आलंय,’ अशी बोचरी टीका यावेळी भंडारी यांनी केली आहे.

‘शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी व ज्यांच्या पाठिंबाच्या भरोश्यावर पवार युपीआयचे अध्यक्ष व्हायला बघत होते ती शिवसेनादेखील या आघाडीपासून लांब राहिली. बहुधा सोनिया गांधींचा राग नको या भीतीने शिवसेनेनं या आघाडीच्या बैठकीकडे पाठ फिरवली, यावरुन या आघाडीची अवस्था काय होणार याचा अंदाज आपण करु शकतो,’ अशी खोचक टीका भंडारी यांनी केली आहे.

वाचाः
संपत्तीसाठी मुलांकडून माजी मंत्र्याचा मानसिक छळ; मुलीच्या आरोपानं खळबळ

‘भाजप किंवा काँग्रेस असा कोणतातरी एक राष्ट्रीय पक्ष केंद्रस्थानी असल्याशिवाय परिणामकार आघाडी निर्माण होत आहे. बिगर भाजप, बिगर काँग्रेस आघाड्या निर्माण करण्याचे प्रयत्न कधीही यशस्वी झाले नाहीत, हा प्रयत्नही यशस्वी होणार नाही,’ असंही ते म्हणाले आहेत.

Source link