सोन्याचे दागिणे असलेली पर्स घेवून रिक्षाचालक पसार

- Advertisement -

पिंपरी : रिक्षात विसरलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असलेली पर्स घेऊन रिक्षाचालक पसार झाला. ही घटना रविवारी (दि. २१) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास खराळवाडी ते भोसरी प्रवासादरम्यान घडली. 

याप्रकरणी, सुरेखा बाबाजी फटांगडे (वय ५५, रा. पिंपरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रिक्षा (क्र. एमएच १४ /ए.एस ११२५) चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी, सुरेखा या रविवारी खराळवाडीहून रिक्षा (क्र. एमएच १४ /ए.एस/११२५) मधून भोसरी येथे कामानिमित्त गेल्या होत्या. रिक्षामधून उतरताना अनावधाने त्यांची पर्स रिक्षामध्येच राहिली. या पर्समध्ये ४ तोळे वजनाचे ६० हजार रुपयाचे सोन्या-चांदीचे दागिणे व रोख २५ हजार रुपयांची रक्कम होती. काही वेळात त्यांना आपली पर्स रिक्षात राहिल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रिक्षाचालकाचा शोध घेतला असता तो सापडला नाही. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -