Home गुन्हा सोन्याचे दागिने खेचून नेणारा महाठग जेरबंद….

सोन्याचे दागिने खेचून नेणारा महाठग जेरबंद….

पनवेल शहर पोलीसांची कामगिरी

पंधरा गुन्हयातील पंधरा लाखांचा ऐवज हस्तगत
बेरोजगार तरूणांना नोकरी लावतो म्हणून त्याची फसवणुक करणारा. मोटारसायकलवरून महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने खेचून नेणारा महाठग तथा सराईत सोनसाखळी चोर पनवेल शहर पोलीसांनी जेरबंद केला आहे. त्याच्याकडून पंधरा गुन्हयांमध्ये चोरी केलेल्या 14 लाख 86 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. आनखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र गिड्डे यांनी पत्रकार बुधवारी परिषदेत सांगितले.

अशा प्रकारे फसवणुक, सोनसाखळी चोरीचे गुन्हे पनवेल, कळंबोली, खालापुर परिसरात घडले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण यांनी गुन्हे प्रगटीकरण कक्षाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. त्यांनी गुन्हयांच्या घटनास्थळी असलेले सीसी टिव्ही फुटेज तपासले. त्याचे बारकाईने निरिक्षण केले असता या गुन्हयांमधील आरोप सराईत असल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर तो रेकाँर्डवरील असल्याचीही माहिती पुढे आली. संबधीत आरोपी कल्याण शहाड येथील आयडीया कंपनी गेटजवळ राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र त्या ठिकाणी जावून माहिती घेतली असता तो तेथे रहात नसल्याचे समजले. त्यानुसार गोपनिय बातमीदाराच्या मार्फत आरोपीचा मोबाईल नंबर पोलीसांनी मिळवला.त्यानुसार तो भिंवडी तालुक्यातील देवरूंग बापगाव येथे राहत असल्याचे उघड झाले. त्यानुसार सापळा रचून 29 वर्षाच्या पाहिजे असलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडे अधिक तपास केला असता पनवेल, कळंबोली, खालापुर, कर्जत आणि नाशिक येथे जबरी चोरी, फसवणुक, व मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून 13 लाख, 46 हजार किंमतीचे 402 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक स्कुटर व बजाज पल्सर मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या. पनवेल शहर पोलीस ठाण्यातील एकूण दहा तर कळंबोली, खालापुर, कर्जत, आडगाव नाशिक, आणि गंगापुर नाशिक येथील प्रत्येकी एक अशा एकूण पंधरा गुन्हयाचे प्रगटीकरण करण्यात यश आले आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण व विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल तारमाळे,विश्वास बाबर, ईशान खरोटे, विजय आयरे,रविंद्र राऊत, बाबाजी थोरात, राजु खेडकर, राजेश मोरे, अमरदिप वाघमारे, यादवराव घुले, अजय वाघ, दिनेश जोशी, रविंद्र कोळी, दिलीप चौधरी, अशपाक शेख, पंकज पवार, संदीप नवले, संजय फुलकर, राहुल साळुंखे, अजय कदम, आणि सुनिल गर्दमारे यांनी या तपास कामी अथक परिश्रम घेतले.

अटक आरोपी सराईत….

संबधीत आरोपीवर या आगोदर उल्हासनगर, नवघर आणि वाशी या ठिकाणी फसवणुक, घरफोडी, तसेच इतर कलामार्तंगत गुन्हे दाखल आहेत.