Home बातम्या व्यवसाय सोन्याच्या दराने तोडले आतापर्यंतचे सर्व ‘रेकॉर्ड’, चांदी देखील ‘महागली’ !

सोन्याच्या दराने तोडले आतापर्यंतचे सर्व ‘रेकॉर्ड’, चांदी देखील ‘महागली’ !

0

नवी दिल्ली : सोन्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. गुरुवारी सोने ५५० रुपयांनी वधारले असून आता सोन्याच्या किंमती ३८,४७० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. हा देशातील विक्रमी दर समजला जात आहे. याशिवाय चांदी देखील चांगलीच तळपली असून चांदीचे भाव ६३० रुपयांनी वधारले आहेत. यामुळे चांदी ४४,००० रुपयांपासून ४४,३०० रुपयांपर्यंत प्रति किलोग्राम झाले आहे.

काल देखील सोन्याचे भाव चांगलेच वधारले होते, काल सोन्याचे भावाने उचांक गाठून सोन्याच्या किंमती १०६० रुपयांना वाढल्या होत्या. म्हणजे सोन्याचे १० ग्रॅमचा भाव ३७,९२० रुपये झाला होता. सोन्याच्या वाढत्या भावाने सामान्य आणि मध्यम वर्गातील लोकांना सोने खरेदी करणे म्हणजे खिशाला कात्री लावण्यासारखे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारांचा विचार करता सध्या न्यूयॉर्कमधील हे भाव १,४९७ डॉलर प्रति औंस आहेत तर चांदीचा भाव १७.१६ डॉलर प्रति औंस आहे.

२०१३ नंतर सर्वात जास्त भाव

जियोजित फायनाशिअल सर्विसेजच्या कमोडिटी रिसर्च विभागाच्या प्रमुखानुसार हरिश वी यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने जवळपास १,५०० डॉलर प्रति औंसच्या स्तरावर आहे, जो २०१३ नंतरचा सर्वात जास्त भाव आहेत. सध्याची आर्थिक परिस्थिती आणि अमेरिका-चीनच्या व्यापार युद्धाचा विचार करता हे भाव गगनाला भिडले आहेत. पश्चिम अशियात देखील भू-राजकीय तणावामुळे सराफ बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे.