काय घडलं नेमकं होतं?
पार्काला फेरी मारल्यानंतर दमल्यामुळे मालपेकर कट्ट्यावर बसल्या होत्या. तेव्हा अनोळखी व्यक्ती वेळ विचारण्यासाठी त्यांच्या समोर आला. मालपेकर यांनी घड्याळ घातले नसल्याने तो तेथून निघून गेला, मात्र काही मिनिटांतच त्यांच्या पाठीमागे येऊन त्याने सोनसाखळी हिसकावली व समोरच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटरसायकलवरून फरार झाला.
या घटनेनंतर पाच मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहोचले. राजा बढे चौकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याची ओळख पटली तो माहीमचा निवासी असल्याची माहिती समोर आली. पोलिसांकडं नोंदवलेल्या जबाबानुसार या सोनसाखळीच्या किंमत साधारण एक लाख २० हजार असून, ती ३० ग्रॅम वजनाची आहे.
‘शिवाजी पार्क हे नेहमीच गर्दीचं ठिकाण आहे. मात्र याठिकाणी सुरक्षायंत्रणेचा अभाव आहे. सीसीटीव्ही फक्त मुख्य प्रवेशद्वाराजवळच आहे. इथं ज्येष्ठ नागरिक, छोटी मुले, महिला यांचा वावर असतो. त्यामुळं सर्वच गेटवर सीसीटीव्ही असणे आवश्यक आहे’, असे मत या घटनेनंतर मालपेकर यांनी नोंदवलं.