Home शहरे मुंबई सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा इशारा

सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा इशारा

0
सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा इशारा

[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेला ‘अल्टिमेटम’ संपलेला आहे. या दरम्यान सरकारकडून कुठलेही स्पष्टीकरण न आल्याने व्यापाऱ्यांनी सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रातील ४ लाख व्यापारी आणि त्यांचे ४० लाख कर्मचारी सज्ज झाले आहेत.

मागील आठवड्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधात अत्यावश्यक सेवा वगळून उर्वरित सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. या निर्णयाला व्यापाऱ्यांनी शुक्रवारपर्यंत सहकार्य केले. परंतु त्याआधी मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना, ‘दोन दिवस धीर धरा, योग्य निर्णय घेऊ’, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवार सायंकाळपर्यंत व्यापाऱ्यांनी सरकारला अंतिम निर्णय घेण्यासाठी इशारा दिला होता. ती मुदत संपल्याने आता व्यापारी आक्रमक झाले आहेत. याबाबत अ. भा. व्यापारी महासंघाच्या (कॅट) मुंबई महानगरची सर्वपक्षीय बैठकीनंतर शनिवारी रात्री उशिरा बैठक झाली. त्यामध्ये सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

आज पुन्हा बैठक

सर्वपक्षीयांच्या शनिवारच्या बैठकीनंतर केवळ ‘कॅट’च्या मुंबई महानगर चमूची बैठक झाली. रविवारी मात्र राज्यभरातील सर्व व्यापारी संघटना पुन्हा एकदा बैठक घेणार आहेत. त्यामध्ये सरकारच्या निर्णयाबाबत महत्त्वाची चर्चा होईल, असे ठक्कर यांनी सांगितले.

[ad_2]

Source link