Home अश्रेणीबद्ध सोलापूर, ग्रामीणचे पोलीस हवालदार इक्बाल शेख यांना सुवर्णपदक

सोलापूर, ग्रामीणचे पोलीस हवालदार इक्बाल शेख यांना सुवर्णपदक

0

पुणे: परवेज शेख

श्री इक्बाल रशीद शेख पोलीस हवालदार सोलापूर ग्रामीण हे सुवर्णपदकासह भारत देशात प्रथम.

अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळावा 2018-2019 हा लखनऊ उत्तर प्रदेश येथे 16 जुलै ते 20 जुलै 2019 या दरम्यान पार पडला. सदर पोलिस कर्तव्य मिळाव्याकरिता भारत देशातील सर्व राज्यांच्या संघाने सहभाग घेतला होता.

महाराष्ट्र पोलीस संघाने 62 वर्षानंतर अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यामध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावून इतिहास घडविला आहे. उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते सर्वसाधारण विजेतेपद महाराष्ट्र पोलीस संघास बहाल करण्यात आले ही महाराष्ट्र राज्यात खूप अभिमानाची व कौतुकास्पद गोष्ट आहे.

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस हवालदार इक्बाल रशीद शेख यांनी अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यामध्ये सुवर्णपदक प्राप्त करून भारत देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. पोलीस हवालदार इक्बाल शेख यांनी यापूर्वीही 06 सुवर्ण, 04 रौप्य व 07 कास्य पदक पटकावून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री सुबोध कुमार जैस्वाल पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, श्री अतुल चंद्र कुलकर्णी अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग, श्री सुहास वारके विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, श्री मनोज पाटील पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री अतुल झेंडे अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तसेच महाराष्ट्रातील जनतेकडून व महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांनी कौतुक करून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.