Home शहरे कोल्हापूर सोलापूर ग्रामीण जिल्हयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे घवघवित यश

सोलापूर ग्रामीण जिल्हयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे घवघवित यश

0

पुणे : परवेज शेख सोलापूर ग्रामीण जिल्हयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे घवघवित यश दिनांक ०२.११.२०१९ ते ०४.११.२०१९ या कालावधीत पोलीस मुख्यालय, सांगली येथे कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा २०१९ चे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या स्पर्धेमध्ये कोल्हापूर परिक्षेत्रातील सोलापूर ग्रामीण, सातारा, सांगली, पुणे ग्रामीण व कोल्हापूर या घटकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला होता. परिक्षेत्रिय कर्तव्य मेळाव्यामध्ये पोलीस विभागात गुन्हे उघडकिस आणण्याकरीता लागणारे कौशल्य ज्यामध्ये एखादा गुन्हा घडल्यानंतर गुन्हयाच्या ठिकाणचा पुरावा गोळा करणे, सदर ठिकाणांचे फोटो काढणे, गुन्हयात पुरावा मिळणेकरीता श्वानांचा वापर कसा करुन घ्यावयाचा, एखाद्या गर्दीच्या ठिकाणी संशयीत वस्तु आढळुन आली तर सदर ठिकाणी कशा रितीने कारवाई करावी, गुन्हयात संगणकाचे सहाय्याने आरोपीचा शोध घेणे इ. बाबतच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेमध्ये एकुण १२० खेळाडू व १३ श्वान सहभागी झाले

या स्पर्धेमध्ये सोलापूर ग्रामीण जिल्हयातील १) अरुण पवार,
२) अन्वर मुजावर ३) इकबाल शेख ४) रविंद्र बाबर,५)
जयवंत सादुल ६) स्वप्निल सण्णके ७) तिरुपती सुरवसे ८) श्वान टेरी हॅन्डलर स्वामी ९) श्वान मॅक्स हॅन्डलर दिंडोरे व कोळेकर- ०१ कांस्य अशी पदके मिळवली असुन पदक विजेत्या पोलीस अधिकारी,कर्मचारी यांना अगामी महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०१९ स्पर्धेकरीता पुणे येथे पाठविण्यात येणार आहे.

वरील नमद पदक विजेते पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मा. मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, मा.अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक, मा.अरुण सावंत, पोनि स्थागुशा तथा प्रभारी पोलीस
उप-अधीक्षक (मुख्यालय) यांचे हस्ते दिनांक ०६/११/२०१९ रोजी पार पडलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये प्रशंसापत्रे देवुन गौरविण्यात आले असुन जिल्हयातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व
कर्मचारी यांनी पदक विजेत्या अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक करुन सत्कार केलेला आहे.