Home शहरे अहमदनगर सौदाळा ग्रामपंचायतीकडुन ई ग्राम व मोफत पिठाच्या गिरणीचे उद्घाटन

सौदाळा ग्रामपंचायतीकडुन ई ग्राम व मोफत पिठाच्या गिरणीचे उद्घाटन

0

अहमदनगर:(प्रतिनीधी कमलेश नवले)नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने १००%घर व पाणी कर भरणारे कुटुंबास मोफत पिठाची गिरणी सुरु केली तसेच अॅनरॉईड मोबाईलच्या आधुनिक युगात सर्वच बाबी ऑनलाईन झाल्या आहेत म्हणुन EGram या अॅपच्या माध्यमातुन ग्रामपंचायत डिजिटल केली आहे हे दोनही उपक्रम सुरु करणारी सौंदाळा ग्रामपंचायत तालुक्यात पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे
या उद्घाटना प्रसंगी बोलताना मा आ पांडुरंग अभंग म्हणाले सौदाळा ग्रामपंचायतीने हे उपक्रम सुरु करुन तालुक्यात सर्व ग्रामपंचायतींच्या पुढे आदर्श ठेवला आहे
बचत गटाच्या प्रणेत्या माजी सभापती सुनिताताई गडाख म्हणाल्या मोफत गिरणी व Egram हे उपक्रप खुपच स्थुत्य आहे या मुळे सौदाळा ग्रामस्थांचा ग्रामविकासात सहभाग वाढेल तालुक्यात सर्वच ग्रामपंचातीने हा उपक्रम सुरु करावा असे आवाहन केले.


सौंदाळा जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक कल्याण नेहुल सर,रविंद्र पागिरे सर व मुख्खाध्यापक श्री घुले सर यांचा ग्रामस्थांचे वतीने मान्यवरांनी सत्कार केला,
यावेळी वडुलेचे सरपंच दिनकरराव गर्जे ज्ञानेश्वर कारखान्याचे जनरल मॅनेजर काकासाहेब शिंदे, सभापती रावसाहेब कांगुणे,उपसभापती किशोर जोजार,काशिनाथ नवले
सरपंच प्रियंका आरगडे,उपसरपंच सरेखा बोधक, सदस्य उषा बबन आरगडे, सविता रेवन आरगडे, रुक्मिणी मारुती आरगडे,लताबाई सोन्याबापु आरगडे, सचिन आरगडे,रामकिसन चामुटे,जगन्नाथ अढागळे,कानिफ आरगडे,दादासाहेब आरगडे,भगवान आरगडे,बाळासाहेब झावरे,अण्णासाहेब आरगडे,बाबासाहेब बोधक,रामकृष्ण आठरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते