Home शहरे गोंदिया स्नपडिलच्या नावावर नागारिकांची फसवणुक

स्नपडिलच्या नावावर नागारिकांची फसवणुक

0

गोंदिया :इलेक्ट्रॉनिक युगात ऑनलाईन शॉपिंगचं फ्याड हे खेड्या पर्यंत पोहचलं आहे. अगोदर व्हॅट्सअँप वर मेसेजेस यायचे की तुम्हांला बक्षीस लागलं कंपनीकडून आणि बँक डिटेल विचारायचे. पण, आता चक्क पोस्टाने आपल्या स्थानिक पत्त्यावर पत्र येवून १० लाखाचे बक्षीस लागल्याचे सांगून बँक डिटेल्स मागवून फसवणूक करण्याचा गोरखधंदा नामांकित स्नँपडिल कंपनीचे नाव समोर करून केल्या जात आहे. मात्र, डव्वा येथील खालील दिलेली पत्र येत आहे. एफ.टी.शाह यांच्या सतर्कतेने त्यांची आँनलाईन फसवणूक टळली.

गोंदिया जिल्ह्यात अनेकांना बक्षीस लागल्याचे पत्र येत आहे. यात काहींची फसवणुकसुद्धा झाली आहे. त्याचप्रकारे एफ.टी.शाह यांना यांना पोस्टाने पत्र आलं त्यात एक लाखाचे बक्षीस व एक कुपन होती. त्याला स्कँच केल्यावर 10 लक्ष रुपयांची कुपन निघाली. त्यांनी पाठवलेल्या हेल्प लाईनवर फोन करून बक्षीसाबाबत विचारले असता त्यांनी रेफरन्स नंबर, एसएमएस कोड, पूर्ण नाव, बँक नाव, खाते एसएमएस द्वारे पाठवण्याचे सांगितले. मात्र, त्यांनी लालच मधे आलो असतो आणि त्यांना हवी असलेली माहिती दिली नाही. व सरळ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी हेल्पलाईन नंबरवर फोन करून विचारलं की बक्षीस लागलं तर मला बोलवा किंवा माझ्या पत्त्यावर चेक पाठवा. मला मूर्ख समजले का? असे म्हणताच हेल्पलाईन नंबर बंद करण्यात आला. शाह यांनी वेळीच सावधगिरी बाळगली नसती तर नक्कीच त्यांची फसवणूक झाली असती. तेव्हा जिल्ह्यातील प्रत्येकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.