Home मनोरंजन ‘स्पर्धकांचं कौतुक करण्यात चुकीचं काय?’ म्हणत राहुल वैद्यचा इंडियन आयडलला पाठिंबा

‘स्पर्धकांचं कौतुक करण्यात चुकीचं काय?’ म्हणत राहुल वैद्यचा इंडियन आयडलला पाठिंबा

0
‘स्पर्धकांचं कौतुक करण्यात चुकीचं काय?’ म्हणत राहुल वैद्यचा इंडियन आयडलला पाठिंबा

[ad_1]

हायलाइट्स:

  • राहुल वैद्य लवकरच गर्लफ्रेंड दिशा परमारसोबत अडकणार आहे लग्नाच्या बेडीत
  • इंडियन आयडलमधूनच राहुल वैद्यला मिळाली होती स्वतःची खरी ओळख
  • सातत्यानं टीका होत असलेल्या ‘इंडियन आयडल’ला राहुल वैद्यनं दिला पाठिंबा

मुंबई: ‘बिग बॉस १४’ फेम राहुल वैद्य मागच्या काही दिवसांपासून त्याचं खासगी आणि व्यावसायिक आयुष्य यामुळे सातत्यानं चर्चेत आहे. एकीकडे लवकरच राहुल ‘खतरों के खिलाडी ११’मध्ये दिसणार आहे. तर दुसरीकडे तो गर्लफ्रेंड दिशा परमारशी लग्नाच्या बेडीतही अडकणार आहे. त्यामुळे राहुल सध्या सोशल मीडियावर जास्तच चर्चेत आहे. अशातच आता राहुल वैद्यनं सिंगिंग रिअलिटी शो ‘इंडियन आयडल’बाबात असं काही वक्तव्य केलं आहे ज्यामुळे त्याच्या नावाची नव्यानं चर्चा होऊ लागली आहे. मागच्या बऱ्याच काळापासून सातत्यानं टीकेचा सामना करत असलेल्या आणि वेगवेगळ्या कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शोला राहुलनं मात्र पाठिंबा दिला आहे.

राहुल वैद्य आज नावाजलेला गायक असला तरीही त्याला सर्वात आधी स्वतःची ओळख आणि प्रसिद्धी ही ‘इंडियन आयडल’ या शोमधूनच मिळाली होती. अशात आता इंडियन आयडलवर सातत्यानं होत असलेल्या टीकेवर राहुलनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी, ‘इंडियन आयडलच्या मेकर्सनी मला स्पर्धकांचं केवळ कौतुक करायला सांगितलं होतं. मी तिथे तेच केलं जे मला सांगण्यात आलं होतं. पण मी हा एपिसोड अजिबात एन्जॉय केला नाही.’ असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या शोवर सातत्यानं टीका केली जाऊ लागली.


आता राहुल वैद्य ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना म्हणाला, ‘इंडियन आयडल १२ बाबत जे वाद झाले त्याबद्दल मला माहीत नाही. शोमध्ये आता काय होतं यामागचं सत्य मला माहीत नाहीये. मी कुठेतरी वाचलं होतं की, कुणीतरी म्हटलं की, त्यांना फक्त स्पर्धकांचं कौतुक करण्यास सांगण्यात आलं होतं. मला वाटतं या शोमधील सर्व गायक चांगले आहेत. त्यांच्या टॅलेंट कोणी नाकारत नाहीये.’

राहुल पुढे म्हणाला, ‘हा शो अखेर फक्त मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे. हा उभारत्या गायकांना व्यासपीठ देण्यासाठी तयार करण्यात आला असला तरीही यासोबत मनोरंजन हा देखील एक हेतू आहे. मग जर एखाद्या पाहुण्या परीक्षकाला स्पर्धकांचं कौतुक करण्यास किंवा त्यांच्यावर टीका न करण्यास सांगण्यात आलं तर त्यात एवढं मोठंसं काय आहे. त्यात चुकीचं काय आहे. मला नाही माहीत लोक यावरून वाद का घालत आहेत.’


राहुल म्हणतो, ‘मी ऐकलंय की शोमध्ये काही रोमँटिक अँगल सुरू आहे, तर हा एक मस्करीचा भाग आहे. त्यांनी कोणी बंदुक रोखून लग्न करायला सांगणार नाहीये. मागच्या ६-७ महिन्यांपासून हा शो सुरू आहे आणि हे फक्त मनोरंजनाचा भाग म्हणून केलं जातं. लवकरच हा शो संपेल नवा सीझन सुरू होईल, स्पर्धक बदलतील आणि सर्व नव्यानं सुरू होईल. त्यामुळे हे सर्व एवढं गांभीर्यानं घ्यायला नको.’



[ad_2]

Source link