स्वप्नील जोशीची ‘समांतर २’ वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

स्वप्नील जोशीची ‘समांतर २’ वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
- Advertisement -


मुंबई- स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘समांतर’ या वेब सीरिजने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मनं जिंकली होती. सिझन १ मध्ये स्वप्नीलने (कुमार महाजन) नितेश भारद्वाजचा (सुदर्शन चक्रपाणी) शोध घेत त्याच्या भविष्यात काय घडणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चक्रपाणी यांनी त्यांचा भूतकाळ आणि कुमारचा भविष्यकाळ असलेली डायरी कुमारच्या स्वाधीन केली होती. त्यानुसार कुमारच्या आयुष्यात काही गोष्टी घडतही होत्या आणि एका मनोरंजक वळणावर येऊन ही कथा संपली होती. जिथे कुमारचे भविष्य स्पष्ट दिसत होते.

जाणून घ्या कधी, कसा आणि केव्हा पाहू शकता विद्या बालनचा ‘शेरनी’

त्यामुळे साहजिकच समीर विध्वंस दिग्दर्शित ‘समांतर २‘ ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती, ती यात आता पुढे काय पाहायला मिळणार याची. ही उत्सुकता अधिक न ताणता एमएक्स प्लेअरने ‘समांतर २’ चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. दोन व्यक्ती, एका आयुष्यात दोन वेगळ्या काळात सारख्याच नशिबाचा सामना करत आहेत. चक्रपाणीचा भूतकाळ कुमारचा भविष्यकाळ ठरवू शकेल का हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागेल. तत्पूर्वी प्रेक्षकांची ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी मराठी एमएक्स ओरिजिनल ‘समांतर २’ चा ट्रेलर २१ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.


समांतरच्या पहिल्या सीजनचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं होतं. यानंतर दुसऱ्या सीजनचं दिग्दर्शन समीर विध्वंस करत आहेत. ताकदीचे दिग्दर्शक ही या वेब सीरिजची नेहमीच जमेची बाजू राहिली आहे. त्यामुळे ‘समांतर २’ मध्येही प्रेक्षकांना दिग्दर्शकाकडून प्रचंड अपेक्षा असणार यात काही शंका नाही. गेल्यावर्षी राज्य सरकारनं काही नियम आणि अटी घालून देत चित्रीकरणास परवानगी दिल्यानंतर या सीरिजच्या शूटिंगला सुरुवात झाली होती.

Indian Idol 12- शनमुखाला परीक्षकांनी दिलं स्टॅण्डिंग ओवेशन

विशेष म्हणजे गेल्या वर्षी जुलै- ऑगस्ट महिन्यात लॉकडाउनचं निर्बंध शिथील केल्यानंतर या सीरिजच्या दुसऱ्या सीजनच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. समांतर वेब सीरिजला १०० दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये वेब सीरिज प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्मात्यांचा मानस होता. पण काही तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य होऊ शकलं नाही. पण आता प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.





Source link

- Advertisement -