Home ताज्या बातम्या स्वबळाचं नंतर बघा, आधी…; संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

स्वबळाचं नंतर बघा, आधी…; संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

0
स्वबळाचं नंतर बघा, आधी…; संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

हायलाइट्स:

  • स्वबळाच्या भाषेवरून महाविकास आघाडीत शाब्दिक चकमकी
  • संजय राऊत यांचा काँग्रेस पक्षाला टोला
  • मुंबईतील राड्यावरून भाजपलाही दिला इशारा

मुंबई: काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेवरून महाविकास आघाडीमध्ये सध्या शाब्दिक चकमकी सुरू आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात याच मुद्द्यावरून काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यानंतर काँग्रेसमध्येही स्वबळाच्या भूमिकेवर एकमत नसल्याचं समोर आलं आहे. त्यावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचा उल्लेख न करता टोला हाणला आहे. (Sanjay Raut Taunts Congress)

वाचा: ‘स्वबळा’च्या भूमिकेवरून काँग्रेसमध्येच मतभेद?

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘राज्यातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. पण त्या पक्षातील एक नेता स्वबळाची भाषा करतो आणि दुसरा नेता त्यास आक्षेप घेतो. हा एक प्रकारचा गोंधळ आहे. कुठलाही भ्रम राहता कामा नये. त्यामुळं त्या सगळ्यांनी आधी त्या गोंधळातून बाहेर यावं, त्यानंतर स्वबळाच्या संदर्भात निर्णय घ्यावा,’ असं राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या निवडणूक लढण्याविषयी विचाराल तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेला व लाखो शिवसैनिकांना दिशा दिली आहे. शिवसेना कोणत्याही लढाईस कायम तयार आहे. बळावर, स्वबळावर किंवा अन्य कोणत्याही विषयावर…,’ असंही राऊत म्हणाले.

अंगावर याल तर सोडणार नाही!

शिवसेना भवनासमोरील राड्यावरही संजय राऊत यांनी पुन्हा भाष्य केलं. ‘या प्रकरणाचा संस्कृतीशी काहीही संबंध नाही. महाराष्ट्र कधी कोणाच्या वाट्याला जात नाही. शिवसेनेचंही तेच आहे. पण कोणी अंगावर आलं तर त्याला सोडतही नाही. त्यामुळं राज्यात शांतता नांदायची असेल तर प्रत्येकानं आपली जबाबदारी आणि कर्तव्य ओळखली पाहिजे. राजकारणासाठी राजकारण आणि विरोधासाठी विरोध हे सध्या करू नये,’ असंही त्यांनी सुनावलं.

वाचा:राणेंच्या पेट्रोल पंपावर राडा; वैभव नाईकांवर गुन्हा दाखल

Source link