सातारा, दि. 12 : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कराड येथील प्रितीसंगमावरील समाधीस्थळास सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
- Advertisement -