
मुंबई, दि. १० – स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. पावनगड (बी ०४) येथे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यानी अभिवादन केले.
मुंबईतील पावनगड येथील शासकीय निवासस्थानी स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करुण पुष्पहार अपर्ण करण्यात आला. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे,सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, रोहयो मंत्री भरत गोगावले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
00000
श्रीमती संध्या गरवारे/विसंअ