ब्लॅक आउटफिटमध्ये नुसरत फार ग्लॅमरस दिसत आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडिओला पसंती दिली. बातमी लिहिण्यापर्यंत ७० लाखांहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. नुसरत सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती अनेक फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकतेच नुसरतने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती निसर्ग सौंदर्याच्या मध्ये फोटो काढताना दिसते.
निखील जैनशी लग्न केल्यानंतर नुसरत जहां आली चर्चेत
नुसरतने पती निखील जैन याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. निखीलने तिला न विचारता तिच्या खात्यातून पैसे काढले असल्याचे नुसरतने आरोप केले आहेत. निखीलसोबत झालेल्या लग्नावर नुसरत म्हणाली की तुर्कीमध्ये झालेलं लग्न भारतात मान्य केलं जात नाही. भारतीय विवाह कायद्यानुसार लग्नच झालं नाही, त्यामुळे घटस्फोटाचा प्रश्नच उद्भवत नाही. काही दिवसांपूर्वी नुसरतने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून निखील आणि तिच्या लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले होते.