Home शहरे मुंबई हजारो ठाणेकरांचा निवारा धोक्यात

हजारो ठाणेकरांचा निवारा धोक्यात

0
हजारो ठाणेकरांचा निवारा धोक्यात

[ad_1]

: शहरातील नऊ प्रभागांमध्ये ४ हजार ५२३ नोंदवण्यात आल्या असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा चार धोकादायक इमारती वाढल्या आहेत. ठाणे महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती घोषित केली जाते. यंदा जाहीर करण्यात आलेल्या इमारतींपैकी ६८ इमारती अतिधोकादायक आणि जीर्ण झाल्यामुळे राहण्यास आयोग्य ठरल्या आहेत. अशा इमारती तत्काळ पाडून टाकण्याची गरज असतानाही अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना यंदाचा पावसाळा जीव मुठीत घेऊन काढावा लागणार आहे. नौपाडा-कोपरी प्रभागात अशा इमारतींची संख्या सर्वाधिक, ३८ इतकी आहे.

पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून त्यात जीवितहानी होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घडत असल्याने दर वर्षी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. प्रभाग समितीनिहाय सर्वेक्षण करून अतिधोकादायक इमारतींची यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात येते. ठाणे महापालिकेकडून घोषित केलेल्या यादीमध्ये अती धोकादायक सी१ श्रेणीमध्ये ६८ इमारतींचा समावेश असून गतवर्षीपेक्षा ही संख्या नऊने कमी झाली आहे. इमारत रिकामी करून दुरुस्त करण्यायोग्य सी२ए वर्गामध्ये १५२ इमारती आहेत. तर रहिवाशांना इमारतीमध्ये राहून दुरुस्त करण्यायोग्य सी२बी वर्गात २४२४ इमारतींचा समावेश आहे. किरकोळ दुरुस्ती करण्यायोग्य सी३ श्रेणीत १८७९ इमारतींची नोंद झाल्याने शहरातील धोकादायक इमारतींची एकूण संख्या ४ हजार ५२३पर्यंत पोहोचली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी मे अखेरीस धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली होती. धोकादायक इमारतींच्या नोंदीमध्ये मुंब्रा प्रभागात १४१९, वागळेमध्ये १०८४, दिवा प्रभागात ८४१, नौपाडा-कोपरी४५४, लोकमान्य-सावरकरनगर २१७, कळवा १९३, उथळसर १३४, माजीवडा मानपाडा १२५ तर वर्तकनगरमध्ये सर्वाधिक ५४ इमारतींचा समावेश आहे.

‘क्लस्टर’प्रतीक्षा कायम

ठाणे शहरातील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना दर्जेदार आणि अधिकृत घरांचा पर्याय देणारी क्लस्टर योजना घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेचे भूमिपूजन झाले असले तरी अद्याप या योजनेची प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. त्यामुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा जीव यंदाच्या पावसाळ्यातही टांगणीला लागलेला आहे. करोना प्रादुर्भावामुळे घरी राहण्याचा आग्रह केला जात असला तरी धोकादायक इमारतींमध्ये राहणे धोक्याचे बनले आहे.

सरासरी ५ हजार धोकादायक इमारती…
ठाणे शहरामध्ये गेल्या पाच वर्षांत दरवर्षी सरासरी ५ हजार धोकादायक इमारती असल्याचे आढळून आले आहे. पाच वर्षामध्ये यंदा ४५२३, २०२० मध्ये ४५१७, २०१९ मध्ये ४५०७, २०१८ मध्ये ४७०५, २०१७ मध्ये ३६९३ आणि २०१६ मध्ये ३६०७ धोकादायक इमारतींची नोंद झाली आहे. दरवर्षी धोकादायक इमारतींच्या याद्या घोषित करण्यात येत असल्या तरी त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने हा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

धोकादायक इमारतींची सद्यस्थिती
प्रभाग समिती सी१ सी२ए सी२बी सी३ एकूण

माजीवडा-मानपाडा १ ७ ९८ १९ १२५

वर्तकनगर ० ९ ३६ ९ ५४

लोकमान्य-सावरकरनगर७ १४ १९३ ३ २१७

वागळे ० २ १०८४ ० १०८६

नौपाडा-कोपरी ३८ १४ ३४६ ५६ ४५४

उथळसर ६ १४ ६९ ४५ १३४

कळवा ५ २० ११३ ५५ १९३

मुंब्रा ६ ६८ ३६४ ९८१ १४१९

दिवा ५ ४ १२१ ७११ ८४१

एकूण ६८ १५२ २४२४ १८७९ ४५२३

(स्रोत- )

[ad_2]

Source link