Home अश्रेणीबद्ध हडपसर पोलिसांनी पाठलाग करून चोरट्यांना पकडले

हडपसर पोलिसांनी पाठलाग करून चोरट्यांना पकडले

0

पुणे-परवेज शेख
पुणे शहरातील विविध भागात घरफोडी करत दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे.जितसिंग ऊर्फ जितु राजपाससिंग टाक (वय.23,रा. वैदवाडी हडपसर) आणि हुकुमसिंग रामसिंग कल्याणी (वय.28,रा.रामटेकडी हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
यातील जितू टाक हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलीसांनी सांगितली आहे.दरम्यान यावेळी चोरट्यांच्या ताब्यातून 20 ग्रॅम सोन्याचे गंठण, एक गॅस सिलेंडर, चोरीच्या चार दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. हडपसर कॉलनी परिसरात दोन व्यक्ती चोरी करण्याच्या हेतूने अंधारात पाहणी करत एका दुचाकीवर थांबले होते.
त्यानुसार पोलिसांनी हटकले असता, दोघेही पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी दोघांनाही पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे.