हडपसर मध्ये एकावर कोयत्याने वार
पुणे : परवेज शेख
दिनांक ११/८/२०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता लोखंडी पुला शेजारी हडपसर पुणे येथे सनी लोंढे याने पब्जी गेम खेळण्यासाठी मोबाईल मागितला असता फिर्यादी यांच्या मित्र सुनील सुरेश माने वय 19 वर्षे राहणार शिंगोट प्लाझा नंबर 15 मांजरी रोड पुणे याने देत नाही. असे म्हणाल्याने त्यांच्यात बाचाबाची होऊन भांडणे झाली होती त्या कारणावरून करण वानखेडे याने सुनील माने याला आज खाल्लास करू याला जिवंत सोडायचा नाही असे म्हणून सुनील माने यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे
- Advertisement -