Home गुन्हा हस्तीदंत विक्रीसाठी आलेल्या दोघांना पुणे शहर पोलिसांनी केली अटक

हस्तीदंत विक्रीसाठी आलेल्या दोघांना पुणे शहर पोलिसांनी केली अटक

0

पुणे : परवेज शेख दि 24/11/2019 :- पुण्यात हस्तीदंत विक्रीसाठी आलेल्या दोघांना पुणे शहर पोलिसांनी सापळा रचून केली अटक त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांचे हस्ती दंत जप्त केले आहेत.
अभय अरविंद जोशी (वय २५, रा. नेरूळ पश्चिम, नवी मुंबई) व याहिया अहमद खान (वय ४२, रा. वाशी, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघे नवी मुंबईत इस्टेट एजंट म्हणून काम करतात. येथील एका व्यक्तीकडून हस्तीदंत घेऊन विक्री करण्यासाठी पुण्यात आले होते. दरम्यान उपनिरीक्षक ए. डी. पिंगळे यांना माहिती मिळाली, की विमानतळ परिसरातील साकोरेनगर रस्त्यावर काहीजण हस्तीदंताची विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून दोघांना संशयावरून ताब्यात त्यावेळी वनविभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.


आरोपींकडून दोन हस्तीदंत जप्त केले आहेत. या दोघांना हस्तिदंत कोणी दिले आहेत, त्यांचे साथीदार कोण आहेत ? याचा तपास सुरू आहे. हत्तीदंत साधारण सात किलोपेक्षा जास्त वजनाचा आहे. त्यांच्याकडून दोन हस्तीदंत, पैसे मोजण्याचे मशीन, मोबाईल असा एकूण ४५ लाख ३७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कामगिरी ही सुनील फुलारी, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रदेशिक विभाग विभाग प्रसाद अक्कानूर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 पुणे शहर देसाई ,सह पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर यांच्या आदेशावरून गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर व बळवंत मांडगे, पोलिस निरीक्षक गुन्हे विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे ए.डी. पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक पोलीस कर्मचारी अविनाश शेवाळे, अशोक आटोळे, अजय खराडे, विशाल गाडे, विश्वनाथ गोणे, राहुल मोरे, संजय आढारी, नाना कर्च, प्रशांत कापुरे, विनोद महाजन, यांच्या या पथकाने कारवाई केली आहे