हातमाग कापड स्पर्धाः इफरा अंजूम प्रथम तर शबाना गिराम द्वितीय – महासंवाद

हातमाग कापड स्पर्धाः इफरा अंजूम प्रथम तर शबाना गिराम द्वितीय – महासंवाद
- Advertisement -




हातमाग कापड स्पर्धाः इफरा अंजूम प्रथम तर शबाना गिराम द्वितीय – महासंवाद

छत्रपती संभाजीनगर,दि.२०(जिमाका)- शासनाच्या वस्त्रोद्योग विभागामार्फत हातमाग कापड उत्कृष्ट नमुन्याची विभागीय हातमाग कापड स्पर्धा २०२४-२५- आज देवगिरी नागरी सहकारी बॅंक लि. प्रशिक्षण केंद्र क्रांती चौक, भुविकास बॅंअक इमारत येथे आयोजीत करण्यात आली. या स्पर्धेसाठी १३ विणकरांनी आपला सहभाग नोंदवून आपले वाण सादर केले. विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे यावेळी उपस्थित होते. प्रादेशीक उपायुक्त वस्त्रोद्योग प्रशांत सदाफुले यांनी त्यांचे स्वागत केले व उपक्रमाची माहिती दिली. या स्पर्धेत इफरा अंजूम यांना प्रथम क्रमांक मिळाला त्यांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. शबाना बेगम फहीम अहेमद गिराम यांना द्वितीय क्रमांक मिळाला त्यांना २० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तर इमरान अहमद कुरेशी हिमरु शाल उत्पादक यांना तिसरा क्रमांक मिळाला. त्यांना १५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही विभागस्तरीय हातमाग कापड स्पर्धा पार पडली.  स्पर्धेसाठी एकूण १३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.त्यापैकी तीन उत्कृष्ट  स्पर्धकांची निवड समितीने केली आहे. अध्यक्षस्थानी दिलीप गावडे हे होते. कार्यक्रमाचे आयोजन  सदस्य सचिव  प्रशांत सदाफुले यांनी केले. निवड समितीमध्ये जिल्हा माहिती अधिकारी, सहाय्यक संचालक, विणकर सेवा केंद्र मुंबई आशुतोष जोशी, विभाग प्रमुख शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय योगेश साठे यांचा समावेश होता. कार्यक्रम यशस्वी होण्यास तांत्रिक सहाय्यक मधुकर गांधीले, लेखापाल श्रीमती रेणुका कुंजर, प्रमुख लिपिक शेख इजाज, घोडेराव, फजल सिद्दिकी व संतोष वाघ यांनी सहकार्य केले.

०००००







- Advertisement -