Home शहरे अकोला हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम आयआयएचटी बरगढ, वेंकटगिरी येथे प्रवेशासाठी १० जूनपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम आयआयएचटी बरगढ, वेंकटगिरी येथे प्रवेशासाठी १० जूनपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन

0
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम आयआयएचटी बरगढ, वेंकटगिरी येथे प्रवेशासाठी १० जूनपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. २५ :- सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्राकरिता हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी  केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था बरगढ आणि वेंकटगिरी येथे अनुक्रमे १४ आणि २ जागांवर  महाराष्ट्र  राज्यातून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी  इच्छुक उमेदवारांनी  १० जूनपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

तीन वर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता केंद्र शासनाच्या   भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्था  बरगढ (ओडिशा) येथे १४ आणि वेंकटगिरी येथे २ जागांवर महाराष्ट्र राज्यातून प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी इच्छुक  उमेदवारांना नागपूर, सोलापूर, मुंबई आणि औरंगाबाद येथील वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांमार्फत विहित नमुन्यातील अर्ज १० जून २०२२ पर्यंत पाठवावे लागणार आहेत. प्रवेश अर्जाचा नमुना आणि इतर माहिती वस्त्रोद्योग विभागाच्या http://www.dirtexmah.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून सर्व प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातदेखील उपलब्ध आहे, असे आयुक्त श्रीमती तेली-उगले यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

०००००

किशोर गांगुर्डे/विसंअ/25.5.22