Home मनोरंजन हातात सँडल,बॅकलेस ड्रेस घालून जान्हवीचा धम्माल डान्स;अर्जुन म्हणाला…

हातात सँडल,बॅकलेस ड्रेस घालून जान्हवीचा धम्माल डान्स;अर्जुन म्हणाला…

0
हातात सँडल,बॅकलेस ड्रेस घालून जान्हवीचा धम्माल डान्स;अर्जुन म्हणाला…

[ad_1]

हायलाइट्स:

  • जान्हवी कपूरचा मित्रमंडळींसोबत धम्माल डान्समस्ती
  • सोशल मीडियावर जान्हवीचा व्हिडीओ झाला व्हायरल
  • बॅकलेस ड्रेस घातलेल्या बहिणाला पाहून अर्जुनने दिली अशी प्रतिक्रिया

मुंबई :जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. ती सातत्याने तिचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. अलिकडेच जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती आपल्या मित्रमंडळींच्या गँगसोबत एका गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडीओमधील प्रत्येकाचे हावभाव पाहून पाहणा-याला हसू आवरत नाही. हा व्हिडीओ जरी मजेशीर असला तरी या व्हिडीओमध्ये जान्हवी खूपच हॉट दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा ब्लॅकलेस ड्रेस घातला आहे.

या व्हिडीओमध्ये जान्हवीने तिच्या मित्रमंडळींची ओळख करून दिली आहे. या सर्व मंडळींच्या हातामध्ये मेकअप ब्रश, स्पीकर आणि हातामध्ये सँडल, स्लिपर घेत या सर्वांनी सिएन पॉलच्या एका गाण्यावर धम्माल डान्स केला आहे. व्हिडीओ शेअर करत जान्हवीने लिहिले आहे, ‘ अक्सा गँग परत आली आहे…’ हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिला भरभरून लाईक आणि कॉमेन्ट केल्या आहेत. तर हा व्हिडीओ पाहून अर्जुनने लिहिले आहे की, ‘यावर आपण जेवणाच्यावेळी भेटू तेव्हा चर्चा करू…’ दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जान्हवीने तिचे बिकीनीमधील हॉट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील तिचा बदलेला अंदाज पाहून तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुक केलं केली आहे.

दरम्यान, जान्हवीच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचे तर अलिकडेच तिचा ‘रुही’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये तिचा डबल रोल होता. या सिनेमात जान्हवीसह राजकुमार राव आणि वरुण शर्मा हे देखील होते. पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला होता. त्याला प्रेक्षकांकडून संमिश्र असता प्रतिसाद मिळाला होता. आता जान्हवीकडे दोस्ताना २ आणि गुड लक जेरी हे दोन मोठ्या बॅनरचे सिनेमे आहेत.

[ad_2]

Source link