पनवेल : शफीक शेख
आज दि. २२/४/२० रोजी रात्री ०२.३० वा. सुमारास पोलीस उपनिरीक्षक बाबर व पथकाने गोपनीय बातमीच्या आधारेच पेठगाव, पनवेल येथील चाळीमध्ये जाऊन छापा घातला असता तेथे तिन इसम दोन खोल्यांमध्ये गॅसच्या शेगडीवर गावठी हातभट्टीची दारू तयार करत असताना आढळून आले.
पोलिसांची चाहूल लागताच एक इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला व इतर दोन इसमांना ताब्यात घेतले.
दोन्ही खोल्यात मिळून एकूण 300 लिटर दारू काढण्याचे रसायन, 7 लिटर तयार हातभट्टीची दारू, दोन गॅस सिलेंडर, दोन शेगड्या, 2 चाटू असा ₹ १७,३००/- च्या मिळून आलेल्या मुद्देमालाचे सॅम्पल घेऊन इतर मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.
१) अनंत बाळकृष्ण सुरते, वय-५७
२) डांसर छोटू राठोड, वय-३८, दोन्ही राहणार पेठगाव, तालुका पनवेल व एका पाहिजे आरोपीविरूद्ध पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर १८२/२० भादंवि कलम १८८, २६९, २७०, २७१, २९० सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५२ व महा. कोव्हिड-१९ उपाय योजना नियम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना अटक करून जामिनावर मुक्त केले आहे.























WhatsApp