Home शहरे मुंबई ‘हा माणूस आहे खरा राजा’, संभाजीराजेंच्या कौतुकाची पोस्ट का होत आहे व्हायरल?

‘हा माणूस आहे खरा राजा’, संभाजीराजेंच्या कौतुकाची पोस्ट का होत आहे व्हायरल?

0
‘हा माणूस आहे खरा राजा’, संभाजीराजेंच्या कौतुकाची पोस्ट का होत आहे व्हायरल?

[ad_1]

हायलाइट्स:

  • मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यभर नाराजी
  • संभाजीराजे छत्रपती यांची संयमी भूमिका ठरत आहे चर्चेचा विषय
  • कौतुक करणारी फेसबुक पोस्ट झाली व्हायरल

मुंबई :मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द करण्यात आल्यानंतर राज्यभरातून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र मराठा आरक्षण आंदोलनात सा
तत्याने सक्रिय असणाऱ्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संभाजीराजेंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. परंतु ही नाराजी व्यक्त करताना त्यांनी अत्यंत संयमी भूमिका मांडत समाजाला शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.

संभाजीराजेंनी घेतलेल्या याच संयमी भूमिकेचं आता कौतुक होत असून कायदेतज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे.

काय आहे असीम सरोदे यांची फेसबुक पोस्ट?

“मराठा आरक्षणाबाबत सगळ्यात संतुलित प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले व सगळ्या वकिलांनी चांगली बाजू मांडली असे ते म्हणाले.

Supernumerary म्हणजे जादा जागा देण्याची पद्धती वापरणे हाच आता राज्य सरकार समोर मार्ग असल्याचे ते म्हणाले.

उद्रेक हा शब्द सुद्धा कुणी काढू नये. सामाजिक स्वास्थ्य व आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत त्यामुळे समाजाने शांत राहावे ही अत्यंत महत्वाची सूचना त्यांनी केली आहे. हा माणूस आहे खरा राजा,” असं असीम सरोदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मराठा आरक्षण आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल

मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये दिलेल्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी मराठा आरक्षण अवैध असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. मात्र ९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश वैध राहतील, असा निर्वाळाही सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.

[ad_2]

Source link