अकोला : पातूर रोडवरील हिंगणा फाट्यानजीक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका ऑटोला पाठीमागून आलेल्या भरधाव खासगी बसने जबर धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ऑटोमधील सात प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अकोला पातूर रोडवरील हिंगणा फाट्यानजीक महालक्ष्मी ट्रान्सपोर्टच्या समोर प्रवासी घेऊन जात असलेल्या ऑटोला पाठीमागून आलेल्या खासगी बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ऑटो 10 फूट घासत गेली, त्यानंतर ऑटो खाली रस्त्याच्या कडेला पडली. या भीषण अपघातात ऑटोतील 7 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. परिसरातील नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रवाशांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या अपघाताची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला असून खासगी बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.