हायलाइट्स:
- सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो गायक हिमेश रेशमिया
- हिमेश रेशमियाच्या एका वक्तव्यामुळे भडकल्या होत्या आशाताई
- आशाताईंनी दिली होती हिमेशच्या कानाखाली मारण्याची धमकी
एकादा हिमेश रेशमिया स्वतःच्या आवाजबद्दल बोलत होता. यावेळी त्यानं सांगितलं की, कधी कधी तो नाकातून गातो. गाण्याच्या आवश्यकतेनुसार असं करावं लागतं. जसं त्यानं आशिक बनाया गायलं होतं. हे सांगताना हिमेशनं महान गायक आरडी बर्मन यांचं नाव घेतलं होतं. हिमेश म्हणला, ‘हाय पीच गाताना नेजल वॉइसचा टच येतो. असं प्रसिद्ध कंपोझर आणि गायक आरडी बर्मन यांच्यासोबतही होत असे.’ स्वतःच्या गायनावर वक्तव्य करत असताना आरडी बर्मन यांचं नाव वापरणं आशाताईंना अजिबात आवडलं नव्हतं आणि यावरूनच त्यांनी हिमेशनला कानशिलात लगावण्याची धमकी दिली होती.
आशाताईंच्या नाराजीनंतर हिमेशला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत त्यानं त्याबद्दल माफीही मागितली होती. अर्थात आशाताईंनी देखील मोठ्या मनानं त्याला माफ केलं. त्यानंतर हिमेश रेशमिया आणि आशाताई एका म्यूझिक शोमध्ये परीक्षक म्हणून एकत्र दिसले होते.
आशा भोसले यांची मोठी बहीण लता मंगेशकर यांनी ‘स्वर कोकिळा’ म्हटलं जातं. त्यामुळे १० हजारपेक्षा अधिक गाणी गायलेल्या आशाताईना बहुमुखी प्रतिभा असलेल्या गायिका असं म्हणायला काहीच हरकत नसावी. आशाताईंनी अशा अनेक गाणी गायली आहेत जी बॉलिवूड सिनेमांच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली आहेत.