हिरकणी हळदी कुंकू वाचा समारंभ कार्यक्षम नगरसेविका आरतीताई कोंढरे यांनी आयोजिला होता

- Advertisement -

परवेज शेख दि. २५ व २६ जानेवारी रोजी संक्रांती निमित्त हिरकणी कलामंच बहुउद्येशीय संस्था अध्यक्ष मा. नगरसेविका सौ. आरतीताई सचिन कोंढरे यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसीय पतंग व सांस्कृतिक लावणी महोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले.


महिलांमधील कलेला वाव देऊन त्यांना मुक्त व्यासपीठ देण्याचा उद्देश साधता प्रत्यक्ष ३०० महिलांनी वंदेमातरम, लावणी, गवळण, जोगवा या मध्ये आपली कलाकारी सादर केली. तर ५०० महिलांनी पतंग महोत्सवात उपस्थित दर्शवत १० महिलांनी प्रथम क्रमांकाचा मान पटवत पैठण्या जिंकल्या.


या मंगल प्रसंगी विद्यमान खासदार मा.श्री. गिरीशजी बापट, मा. सौ. गिरीजाताई बापट, मा. सौ. स्वरदाताई बापट, महापौर मा. श्री. मुरलीधरआण्णा मोहोळ, उपमहापौर मा. सौ. सरस्वतीताई शेंडगे, सभागृह नेते मा. श्री. धीरजजी घाटे, स्थायी समिती अध्यक्ष मा. श्री. हेमंतजी रासने, नगरसेवक अजयजी खेडेकर, अभिनेत्री लिला गांधी, मा. शकुंतला नगरकर, उद्योजीका मा. प्रती काळे मा. डॉ. विठ्ठलराव जाधव डि आयजी (से.वि), मा. सौ.विद्याताई जाधव व आदी मान्यवर उपस्थित होते. तर लकी ड्रॉ चा आनंद लुटत २००० महिलांनी कार्यक्रमाचा सहभाग घेतला.


- Advertisement -