Home ताज्या बातम्या ‘ही उद्धव ठाकरेंची माफियासेना; सगळे एकामागोमाग जेलमध्ये जाणार’

‘ही उद्धव ठाकरेंची माफियासेना; सगळे एकामागोमाग जेलमध्ये जाणार’

0
‘ही उद्धव ठाकरेंची माफियासेना; सगळे एकामागोमाग जेलमध्ये जाणार’

हायलाइट्स:

  • प्रदीप शर्मा यांच्या घरी एनआयएची छापेमारी
  • मनसुख हत्याप्रकरणात करण्यात आली कारवाई
  • भाजपनं साधला शिवसेनेवर निशाणा

मुंबईः अँटिलिया स्फोटके प्रकरण व मनसुख हिरण हत्या प्रकरणात माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज पहाटे छापे टाकले आहे. ‘एनआयए’च्या या कारवाईनंतर भाजपनं शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्यावरही आरोप केले आहेत. ‘मनसुख हिरण हत्याप्रकरणात प्रदीप शर्मा यांच्या घरावर ‘एनआयए’नं छापेमारी केली आहे. याआधी शिवसेनेचे प्रवक्ते सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती,’ असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसंच, ‘शिवसेना मंत्री अनिल परब यांचे पार्टनर असलेले सदानंद कदम यांचा सहकारी शिवसेनेचा शाखाप्रमुख असून याचं वाहन मनसुख हिरणला मारण्यासाठी सचिन वाझेला देण्यात आलं होतं. ही सगळी उद्धव ठाकरेंची माफिया सेना आहे,’ असा आरोपही त्यांनी केला आहे.

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा ‘एनआयए’च्या रडारवर; मुंबईतील घरावर छापे
‘मनसुख हिरण प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होत असली तरी सचिन वाझे यांनी अनिल परब-प्रदीप शर्मा यांच्याबाबत वसुलीसंबंधी जी माहिती दिली आहे त्यानंतर अनिल परब यांच्या घरीही यंत्रणा पोहोचली तरी मला आश्चर्य वाटणार नाही,’ असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंची जी गुंडसेना आहे त्यातील सगळे एकामागोमाग एक जेलमध्ये जाणार आहेत, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

बीएचआर गैरव्यवहार: आर्थिक गुन्हे शाखेची पहाटे धडक कारवाई; ‘ते’ संशयित अखेर ताब्यात

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवास्थानाजवळ सुमारे अडीच किलो जिलेटीन ठेवलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. या प्रकरणात एनआयएने सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. स्कॉर्पिओचे मालक असलेल्या मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपासही एनआयएकडे असून या दोन्ही प्रकरणात वाझेयांच्यासंपर्कात प्रदीप शर्मा होते, असं एनआयएतील सूत्रांकडून समजतेय.

Source link